• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कोलाड पोलिस ठाण्यातील शस्त्रे पाहून तिसे हायस्कूलचे विद्यार्थी भारावले!

ByEditor

Jan 3, 2025

विश्वास निकम
कोलाड :
‘पोलीस रेंझिंग डे’ निमित्ताने कोलाड पोलीस ठाण्याकडून २ जानेवारी २०२५ ते ८ जानेवारी २०२५ दरम्यान ‘पोलीस रेंझिंग डे’ सप्ताह राबविण्यात येत असुन त्या अनुषंगाने शुक्रवार, दि. ३ जानेवारी २०२५ रोजी कोलाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तिसे येथील कृष्णाजी संभाजी गोरीवले माध्यमिक हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भोजकर, गोपनीय अंमलदार सहा. पोलीस उपनिरीक्षक नरेश पाटील, एटीसी कर्मचारी डी. एन. पांचाळ, पोलीस अंमलदार डी. बी. महाडिक यांनी शस्त्रास्त्रे, सायबर क्राईम, रस्ते सुरक्षितता याबाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्रे हाताळण्यासाठी दिली.

चित्रपटामध्ये पाहण्यात येणारी खरीखुरी पोलीस हत्यारे हाताळण्यास मिळाल्याने सर्व विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी भारावून गेले होते. यावेळी शाळेचे मुख्यध्यापक नवनाथ गोदे, रविंद्र गिरासे, लिलाधर जांभेकर, शारदा गोरीवले, वैशाली जाधव, उर्मिला गोडांबे, अशोक शिंदे, प्रदीप दिवकर व इतर शिक्षकेतर कर्मचारी तसेच ८५ ते ९० विद्यार्थी उपस्थित होते.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!