शिबिराला श्रीवर्धनमध्ये 376 जणांचे रक्तदान
गणेश प्रभाळे
दिघी : जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणिजधाम महाराष्ट्र यांच्या वतीने रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील 376 नागरिकांनी रक्तदान केले.
दरवर्षी रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात येते. यासाठी १२०० हुन अधिक ठिकाणी महाराष्ट्रात रक्तदान महायज्ञ सुरू आहे. त्याप्रमाणे या कालावधीत होणारा रक्तदान महायज्ञाची सुरुवात श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय येथे करण्यात आली. यामध्ये 186 रक्त पिशव्या संकलित करण्यात आल्या. त्यानंतर बोर्लीपंचतन येथे 79 बॅग संकलित करण्यात आल्या. तसेच नुकत्याच भरडखोल कोळी समाज सभागृह येथे रक्तदान महायज्ञ शिबिर कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये 111 जणांनी शिबिरात सहभाग नोंदविला. अशाप्रकारे श्रीवर्धन तालुक्यामध्ये तीन शिबिरात एकूण 376 रक्तकुपिका संकलित करण्यात आले.
श्रीवर्धन येथे झालेले रक्तदान महायज्ञ पूर्ण होण्यासाठी कूपर ब्लड बँकचे डॉ. भरत चौधरी तसेच त्याचे सहकारी याने खुप सहकार्य केले. भरडखोल येथे झालेल्या रक्तदान शिबिरात अखंड भरडखोल कोळी समाज यांच्या सहकार्यने रक्तदान शिबिर उपक्रम व्यवस्थित रित्या पार पाडला.
या शिबिरात अखंड भरडखोल कोळी समाजाचे प्रेरणास्थान ह.भ.प. रामचंद्र वाघे, अध्यक्ष विट्ठल भोईनकर, उपाध्यक्ष महादेव चौलकर, सरपंच ज्योती काळपाटील, उपसरपंच भास्कर चौलकर आणि पंचकमेटी तसेच महिला मंडळ, ग्रामस्त मंडळ यांच्या उपस्थितित रक्तदान शिबिराला सुरवात करण्यात आली. श्रीवर्धन तालुका येथील रक्तदान महायज्ञ शिबिर पूर्ण होण्यासाठी द. रायगड जिल्हा कमिटी, श्रीवर्धन तालुका कमिटी, तालुका संग्राम सैनिक, तालुका युवा टीम तसेच तालुक्यातील भक्तगणानी विशेष मेहनत घेऊन रक्तदान शिबिर उपक्रम पार पाडले.
