• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

नेरळ–खोपोली लोकल रविवारी रद्द

ByEditor

Jan 18, 2025

कर्जत : मध्य रेल्वेच्या कर्जत यार्डतील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी रविवारी विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत नेरळ – खोपोलीदरम्यान उपनगरीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी ११.२० ते दुपारी १.०५ दरम्यान मध्य रेल्वेच्या पळसधरी (क्रॉसओव्हर वगळून) आणि कर्जत स्थानकांदरम्यान (क्रॉसओव्हरसह) अप आणि मध्य मार्गिकेवर, कर्जत (क्रॉसओव्हरसह) ते चौक/भिवपुरी स्थानक (क्रॉसओव्हर वगळून) अप आणि डाऊन मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत नेरळ – खोपोलीदरम्यानची लोकल सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. दुपारी १२ आणि दुपारी १.१५ वाजता कर्जत येथून सुटणारी खोपोली लोकल, सकाळी ११.२० आणि दुपारी १२.४० वाजता खोपोली येथून कर्जत जाणारी लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

सीएसएमटी येथून सकाळी ९.२७ ते सकाळी ११.१४ या वेळेत निघणाऱ्या सीएसएमटी – कर्जत लोकल नेरळ स्थानकावर थांबविण्यात येतील. सकाळी ११.१९ ते दुपारी १ या वेळेत सुटणाऱ्या कर्जत – सीएसएमटी लोकल नेरळपर्यंत चालवण्यात येतील.

गाडी क्रमांक ११०१४ कोईम्बतूर- एलटीटी एक्स्प्रेस सकाळी ११.३० ते दुपारी १२.४० या वेळेत लोणावळ्यात थांबवण्यात येईल. गाडी क्रमांक १२४९३ पुणे – हजरत निजामुद्दीन वातानुकूलित एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १२१६४ चेन्नई- एलटीटी एक्स्प्रेसच पुणे विभागात थांबवण्यात येतील. दुपारी १२.५० वाजल्यानंतर या रेल्वेगाड्या लोणावळा येथे पोहचतील.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!