प्रतिनिधी
रोहा : श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल चणेरा, तालुका रोहा येथे श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहाच्या पाचव्या पुष्पानिमित्त अंश फाउंडेशन यांच्यातर्फे सायबर क्राईम विषयी माहिती देण्यात आली. यामध्ये सोशल मीडियाचा वापर कसा करावा, डिजिटल बँकिंग काळजी कशी घ्यावी, सायबर कायदे, ऑनलाईन गेम, अनोळखी व्यक्तीबरोबर सोशल मीडियावर बोलू नका, सोशल मीडियाचा वापर करण्याचे वय, सोशल मीडिया वापरताना घ्यावयाची काळजी, शिक्षेची तरतूद याबद्दल माहिती देण्यात आली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सायबर प्रतिज्ञा देण्यात आली.


अंश फाउंडेशनकडून इंग्लिश स्पिकिंग, इंटरनेटचा वापर, एमएस पॉवरपॉइंट, एमएस एक्सल, एमएस वर्ड याचे संगणकीय शिक्षण मोफत देण्यात येते. गरजू विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन मुख्याध्यापक के. बी. पाटील यांनी केले. यावेळी अंश फाउंडेशनचे कार्यकारी अधिकारी निलेश गुंड व सृष्टी पनवेलकर यांचे मुख्याध्यापकांनी आभार मानले.


