सलीम शेख
माणगाव : रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा वाद सुरू असतानाच २२ जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची पत्रकार परिषद माणगाव कुणबी भवन येथे पार पडली. या पत्रकार परिषदेत शिवसेना आमदार भरत गोगावले, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर व शिवसेनेचे आमदार हे वैफल्यग्रस्त भावनेतून खा. तटकरे यांच्यावर टीका करत आहेत, मात्र त्यांनी पात्रता ओळखून टीका करावी. आम्ही विधानसभा निवडणुकीत महायुतीचा धर्म पाळून काम केले आहे. हे मतांच्या आकडेवारीतुन दिसून आले आहे. पालकमंत्री पदाचा निर्णय मुख्यमंत्री विदेश दौऱ्यावरून परत आल्यानंतर दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह घेतील. तो निर्णय आम्हाला आणि आमच्या पक्षाला मान्य असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा सुसंस्कृत विचारांचा पक्ष आहे. त्यामुळे आमच्यावर कुणी टीका केली तरी आम्ही त्यांच्यावर काहीही भाष्य करणार नाही. अशा अनेक मुद्द्यांना रा. काँ. जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांनी पत्रकार परिषदेत हात घातला.
या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश प्रवक्त्या ॲड. सायली दळवी म्हणाल्या की, छत्रपती शिवरायांच्या व राजमाता जिजाऊ यांच्या भूमीत एका महिलेला पालकमंत्री पद मिळत असताना त्याला विरोध कशाला? ना. आदिती तटकरे यांनी महिला बालविकास खात्याचा कारभार उत्कृष्टरित्या सांभाळला आहे. त्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल किंवा महिला सक्षमिकारण आणि सशक्तीकरण यासाठी त्यांनी ठोस पावले उचलली. त्यामुळे अनेक योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहचल्या. त्यांच्या कार्याची दखल घेऊनच त्यांना रायगडचे पालकमंत्री पद देण्यात आले होते. परंतु आता स्थगिती जरी देण्यात आली असली तरी मुख्यमंत्री भारतात परतल्यावर योग्य तो निर्णय घेतील.
या पत्रकार परिषदेस रा. काँ. जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्त्या ॲड. सायली दळवी, ज्येष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष शेखरशेठ देशमुख, ज्येष्ठ नेते महादेव बक्कम, जिल्हा उपाध्यक्ष रविंद्र मोरे, तालुका अध्यक्ष बाळाराम (काका) नवगणे, महिला आघाडी तालुका अध्यक्षा संगिता बक्कम, अल्पसंख्याक सेल श्रीवर्धन मतदार संघ अध्यक्ष अल्ताफ धनसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा कार्यध्यक्ष शादाब गैबी, उपनगराध्यक्षा हर्षदा सोंडकर, महिला आघाडी माणगाव शहराध्यक्षा योगिता चव्हाण, उणेगाव माजी सरपंच राजेंद्र शिर्के, सुमित काळे, इम्तियाज धनसे आदी उपस्थित होते.

Tatkare chi laayki aahe ka bhaadkhau