प्रतिनिधी
नागोठणे : येथील कोएसो आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व आजीवन निरंतर शिक्षण व विस्तार विभागातर्फे २५ जानेवारी रोजी १५व्या मतदार जनजागृती दिनाच्या निमित्ताने मतदान प्रतिज्ञा व जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅली दरम्यान नागोठणे येथील गांधी चौकात मतदान जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले.



ही रॅली महाविद्यालयातून आंगर आळी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, बाजारपेठेतून प्रभूआळीमार्गे महाविद्यालयात विसर्जित करण्यात आली. याप्रसंगी प्रभारी प्राचार्य डॉ. संदेश गुरव, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे व डॉ. मनोहर शिरसाठ, आजीवन निरंतर शिक्षण व अध्ययन प्रमुख डॉ. राणी ठाकरे, वनस्पती विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजय चव्हाण, डॉ. विलास जाधवर, डॉ. विकास शिंदे यांच्यासह १२५ विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पथनाट्य सादरीकरणात कु. करन देशमुख, कु. आदित्य जाधव, कु. अंश मोहिते, कु. श्रावणी मांडवकर, तेजल डाकी, कु. आलिशा साळुंखे, कु. आर्या घासे, कु. पायल गुप्ता, कु. सपना वाघमारे, कु. अनुष्का भोईर व कु. साहिल घरत यांनी भाग घेतला.

