• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांच्यावतीने पीएम किसान लाभार्थ्यांकरिता ‘किसान ओळखपत्र’ शिबिर

ByEditor

Jan 28, 2025

शिबिराचा अनेक शेतकऱ्यांनी घेतला लाभ

अब्दुल सोगावकर
सोगाव :
अलिबाग तालुक्यातील मापगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुनवली विभागातील शेतकऱ्यांना ‘पंतप्रधान किसान लाभार्थी’ योजनेचा लाभ घेण्यासाठी रविवार दि. २६ जानेवारी २०२५ पूर्वी किसान ओळखपत्र आवश्यक करण्यात आले आहे. सदर ओळखपत्र ऑनलाइन बनवण्यासाठी शेतकऱ्यांना गावापासून लांब शहरात अथवा इतर ठिकाणी जाण्यासाठी वेळ व आर्थिक खर्च वाचविण्या हेतू रायगड जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष व माजी मापगाव सरपंच सुनिल थळे यांच्या मार्गदर्शनाखाली मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी शुक्रवार दि. २४ ते २६ जानेवारी २०२५ पर्यंत पंतप्रधान किसान ओळखपत्र ऑनलाइन काढण्यासाठी गावातच सदर शिबिराचे मोफत आयोजन केले होते. या शिबिराचा मुनवली पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला, याबद्दल शेतकऱ्यांनी सचिन घाडी यांचे आभार मानले आहेत.

शासनाने २६ जानेवारी २०२५ पर्यंत पंतप्रधान किसान योजना, पीक कर्ज, इतर शासकीय अनुदान व विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी ओळखपत्र आवश्यक करण्यात आले होते. याची मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी जाणीव ठेवून सर्वसामान्य शेतकऱ्यांना वेळेची व आर्थिक परिस्थिती पाहता गावातच मोफत पंतप्रधान किसान ओळखपत्र बनवण्यासाठी शिबिराचे आयोजन केले. या शिबिराचा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेत आपले ओळखपत्र बनवून घेतले. शिबीर यशस्वी होण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी, सतिश घाडी, रायगड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईक कप्तान, अरविंद मसुरकर, अशोक मसुरकर, सुरेश हुमणे, दिलिप मोंढे, संतोष बांद्रे, तसलीम कप्तान, शबाब खान, गितेश ठकरुळ, नितीन घाडी तसेच चोंढी येथील महा. इ सेतू केंद्राचे तेजस पाटील, मीनल पाटील, रचना माने यांनी विशेष सहकार्य केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!