क्रीडा प्रतिनिधी
अलिबाग : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या पुरुषांच्या खुल्या गटातील निमंत्रित स्पर्धेसाठी काल रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा संघ जाहीर करण्यात आला आहे. अलिबाग क्रिकेट अकॅडमी संघाचा तंत्रशुद्ध फलंदाज ऋषिकेश राऊत याची संघाच्या कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा संघ पुढील प्रमाणे :
ऋषिकेश राऊत (कर्णधार), देवांश तांडेल (उपकर्णधार), ऋषिकेश नाईक, श्रेयस कुमार, निकुंज विठलानी, आर्यन देशमुख, प्रतिक म्हात्रे, ओम जाधव (यष्टिरक्षक), मिहिर भाटकर, प्रतित गोटसुर्वे (यष्टिरक्षक), रितेश तिवारी, तेजस मोहिते, विघ्नेश पाटील, कौस्तुभ म्हात्रे.
राखीव खेळाडू : अभिषेक खातू, संतोष गोस्वामी, साहिल देसाई,मिलन चौरसिया, समीर आवास्कर,
पश्चिम विभागासाठी : अभिषेक जैन अंशुमन जैस्वाल, कौस्तुभ चौधरी, अभिषेक नाईक, आयुष माळी
वरील संघांची निवड हि पहिल्या दोन सामन्यासाठी असणार आहे. रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाची निवड हि निवड चाचणी स्पर्धेतून करण्यात आली असून रायगड जिल्ह्याचा संघ महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निमंत्रित दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे. निवड झालेल्या संघाला आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.