• Sat. Jul 12th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

सृष्टी शिदच्या मृत्यू प्रकरणी चिरनेर आश्रमशाळेतील मुख्यध्यापक, अधीक्षक व शिक्षकांवर गुन्हे दाखल

ByEditor

Feb 13, 2025

दीड महिन्यानंतर दोषींवर केला गुन्हा दाखल

आदिवासी समन्वय समिती अध्यक्ष गणपत वारगडा यांनी घेतला पुढाकार

विठ्ठल ममताबादे
उरण :
पनवेल तालुक्यातील तामसई येथील कु. सृष्टी राजू शिद ही उरण तालुक्यातील चिरनेर आदिवासी आश्रमाशाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत होती. अचानक तिच्या पोटात दुखायला लागले. कु. सृष्टी आणि तिच्या मैत्रिणींनी आश्रमशाळेतील असणाऱ्या शिक्षकांना सांगितले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले. नंतर काही तासाने सृष्टीला उपचारासाठी पनवेल येथे नेण्यात आले. उपचार चालू असताना मृत्यूची झुंज देत होती, शेवटी सृष्टी शिदचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि पिडीत कुटुंबाना धक्का बसला.

आश्रमशाळेतील व्यवस्थापकीय मंडळीनी जर वेळेत सृष्टीचा उपचार केला असता तर त्या चिमूकल्या मुलीचा जीव वाचला असता, असा पालकांनी आरोप करत शाळा व्यवस्थापकीय मंडळींवर गुन्हा दाखल करा यासाठी सृष्टीचे आई-वडील आणि काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनला अनेक पत्र दिली. मात्र गुन्हा दाखल झाला नाही. शेवटी आई वडिलांनी पोलीस उपायुक्त, परीमंडळ २ कार्यालयासमोर उपोषण करण्याचे पत्र दिले आणि मंगळवार (दि. ११ फेब्रुवारी) रोजी सकाळी ११ वाजता उपोषणाला सुरुवात करताच सहायक पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेतली.

यावेळी आदिवासी समन्वय समिती रायगड जिल्हा अध्यक्ष, पत्रकार गणपत वारगडा, लक्ष्मण शिद, मयत सृष्टीचे आई वडील शोभा राजू शिद आणि त्यांचे नातेवाईकांसह तात्काळ उरण पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास चिरनेर आदिवासी आश्रमाशाळेतील मुख्याध्यापक आप्पासाहेब मोरे, अधीक्षक सतीश मोरे, शिक्षक महादेव डोईफोडे यांच्यासह इतर शिक्षक आणि स्टाफवर भारतीय न्याय सहिंता (बीएनएस) २०२३ कलम १०६(१), ३(५), अल्पवयीन न्याय (मुलाची काळजी व संरक्षण) कायदा २०१५ कलम ७५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात उरण वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ, पोलीस उप निरीक्षक संजय साबळे अधिक तपास करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!