प्रतिनिधी
नागोठणे : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी २०२५ रोजी बहूविद्याशाखेय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सदर परिषद ऑफलाईन व ऑनलाईन या दोन स्वरूपात संपन्न झाली. या परिषदेत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक डॉ. संजय देशमुख यांचे उदघाटनपर (की नोट ॲड्रेस) भाषण झाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. दिनेश भगत यांनी भुषवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. संदेश गुरव यांनी केले. याप्रसंगी जे. एस. एम. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य हे अतिथी म्हणून सहभागी होऊन त्यांनी सहभागी संशोधकांशी संवाद साधला. दुसऱ्या सत्रात फ्लोरिडा विद्यापीठ, अमेरिका येथिल प्राध्यापक डॉ. मुकुंद टंटक यांनी आपल्या संशोधन कार्यावरील लेखाद्वारे संशोधक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सत्राचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. गुरूमीत वाधवा यांनी काम पाहिले. परिषदेच्या तिसऱ्या सत्रामध्ये प्राध्यापक डॉ. रामा लोखंडे- राजस्थान विद्यापीठ, राजस्थान यांनी कार्बन डायॉक्साईड कमी होण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित झाले असल्याचे सांगितले. जागतिक तापमानवाढ रोखण्यासाठी हे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
चौथ्या सत्रात विविध राज्यातून व परदेशातील संशोधन पेपरचे सादरीकरण झुमद्वारे व महाविद्यालयात उपस्थित संशोधक विद्यार्थी व शिक्षकांनी प्रत्यक्ष सादरीकरण केले. यासाठी प्रा. डॉ. घनश्याम साठे व प्रा. डॉ. भगवान जाधव यांनी सादरीकरणाचे परीक्षण केले. या सत्राचे अध्यक्षस्थान प्रा. डॉ. नंदकिशोर चंदन व प्राचार्य डॉ. सोनाली पाटील यांनी भुषवले. पाचव्या सत्रात महाविद्यालयात राज्याच्या विविध महाविद्यालयातून आलेल्या पोस्टरचे परीक्षण करण्यात आले. यासाठी परीक्षक म्हणून डॉ. प्रविण चव्हाण यांनी काम पाहिले. प्र. प्राचार्य डॉ.साजिद शेख यांनी अध्यक्ष म्हणून काम पाहिले. या दोन्ही विभागातील चांगल्या तीन सादरीकरणास पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. ही परिषद यशस्वी करण्यासाठी प्र. प्राचार्य डॉ . दिनेश भगत यांच्या नेतृत्वाखाली या परिषदेचे व्हाईस चेअरमन डॉ. संदेश गुरव परिषदेचे समन्वय प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे, प्रा. विजय चव्हाण, प्रा. सतिष पाटील, प्रा. व्ही. आर. जाधवर, प्रा. जयेश पाटील, प्रा. डॉ. स्मिता चौधरी, प्रा. डॉ. मनोहर शिरसाठ, प्रा. डॉ. स्मिता मोरबाळे, प्रा. प्रा. डॉ. विकास शिंदे, प्रा. डॉ. राणी ठाकरे इ. यांनी मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे दिवसभर झूम द्वारे थेट प्रक्षेपणासाठी प्रा. हेमंत जाधव व प्रा. सौ. निलम महाले यांनी आपला अमुल्य वेळ दिला. या परिषदेसाठी एकुण १८७ संशोधन शिक्षक कंपनी च्या कर्मचारी वर्गाने सादरीकरणासाठी नोंदनी केली होती. या परिषदेत जवळजवळ २५० शिक्षक, व संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. मनोहर शिरसाठ यांनी केले. शेवटी परिषद समन्वयक प्रा. डॉ. श्रीकृष्ण सुमारे यांनी उपस्थित व ऑनलाईन सहभागी संशोधक विद्यार्थी, शिक्षक व इतर प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मदत करणाऱ्यांचे आभार मानले. ही परिषद यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली. परिषद यशस्वी केल्याबद्दल कोएसोचे अध्यक्ष मा. ॲड. सिद्धार्थ पाटील, कार्यवाह ॲड. पल्लवी पाटील, वरीष्ठ संचालक संजय पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक खोपकर, सह कार्यकारी अधिकारी, अनिता पाटील व प्रा. सुरेंद्र दातार, स्थानिक महाविद्यालय समिती सदस्य नरेंद्र जैन, अनिल काळे व ॲड. सोनल जैन यांनी सर्वांचे अभिनंदन केले.