विनायक पाटील
पेण : येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख अतिथी म्हणून लक्ष्मण खेडकर, अविनाश आमले, माधव कृष्णाजी नाईक, डॉ. सुरज विकास म्हात्रे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुरलीधर वाघ हे होते.
पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून, संस्था प्रार्थनेने या कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिमखाना विभागाचे प्रमुख संतोष गुरव यांनी केले. सुप्रसिद्ध कवी लक्ष्मण खेडकर प्रमुख अतिथी म्हणून बोलताना असे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न करून आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम करावेत, प्रेम, शेतकरी, बाप आदि कविता त्यांनी सादर केल्या. यातील बाप कवितेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तांबाटी गावाचे सरपंच अविनाश आमले यांनीही समायोचित मार्गदर्शन केले. आमले बोलताना म्हणाले की, कान हे ज्ञानग्रहण करण्याचे महत्त्वाचे अवयव असून त्याचा सुयोग्य पद्धतीने वापर केल्यास माणसाला शक्य ती उंची गाठता येते, काम कोणतेही असो आपण त्यावर निश्चित प्रेम केले तर आपल्याला हरवता येणे कुणालाही शक्य नाही.
माधव कृष्णाजी नाईक यांनी माजी प्राचार्य कृष्णाजी नाईक तसेच मातोश्री अनुराधा नाईक यांच्या स्मृती प्रित्यर्थ विद्यार्थ्यांना सन्मानित करताना आनंद होत आहे अशी भावना व्यक्त केली. तसेच डॉ. सुरज म्हात्रे यांनी, गुरुजनांचा आणि आईबाबांचा राग हा आपल्याच भल्यासाठी असतो अशी शिकवण विद्यार्थ्यांना दिली. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ मुरलीधर वाघ यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना, आपल्या वाटा आपणच निर्माण करायच्या असतात, असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
विविध खेळ आणि सांस्कृतिक स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना याप्रसंगी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. विनायक पवार यांनी केले, तर आभार हिंदी विभागाचे हिरामण टोंगारे यांनी केले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी, डॉ. राजेंद्र शिंगटे, डॉ. श्रीकांत महादाने, प्रा. महेश भोपळे, डॉ. आलम शेख, डॉ. बाळासाहेब सरगर, प्रा. लक्ष्मण कुमारे यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी प्रा. मेघश्याम, डॉ. वागतकर, प्रा. वळवी, डॉ. पुजारी, डॉ. बगाडे, प्रा. बनसोडे मॅम, डॉ. उषाताई मगरे, प्रा. आडलीकर, कार्यालयीन अधीक्षक एकनाथ चव्हाण, श्रीमती काळोखे, श्रीमती कदम, शुभ्रा मॅम, मोहन पाटील, पिलाजी पवार, पांचाळ मावशी हे व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.