• Mon. Jun 23rd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली, रुधिरसेतू सेवा संस्था यांच्यावतीने २३ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

ByEditor

Feb 20, 2025

वार्ताहर
पाली :
रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान तर आहेच, परंतु ती देशसेवाही आहे. रक्त देऊन आपण एखाद्या व्यक्तीला जीवनदान देत असतो, ही बाब आपल्या आयुष्यात खूप श्रेष्ठ ठरते. त्यामुळेच ही सामाजिक जाणीव आणि गरज लक्षात घेऊन श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली, रुधिरसेतू सेवा संस्था व राजस्थानी महिला मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक २३/०२/२०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत भक्त निवास क्र. १ येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जास्तीत जास्त दात्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली तर्फे करण्यात आले आहे.

राज्यात दरवर्षी उन्हाळ्यामध्ये रक्ताचा मोठा तुटवडा भासतो. तो भरून काढणे अत्यंतिक आवश्यक असते, अन्यथा शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागतात. एखादी तातडीची शस्रक्रिया असेल तर त्यात रक्ताच्या तुटवड्यामुळे गुंतागुंत निर्माण होऊ शकते. त्यामुळेच रक्ताची गरज लक्षात घेऊन श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली, रुधिरसेतू सेवा संस्था व राजस्थानी महिला मंडळ पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक २३/०२/२०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत भक्त निवास क्र. १ येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या रक्तदान शिबीरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी भाग घेऊन रक्तदान करावे असे आवाहन श्री बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट पाली यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!