रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अलिबाग : खासगी शिकवणीमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन करणाऱ्या एका शिक्षकाला ग्रामस्थांनी चांगलाच चोप देऊन रेवदंडा पोलिसांच्या ताब्यात दिले. त्या शिक्षकाला रेवदंडा पोलिसांनी अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रेवदंडा बाजारपेठ हमरस्त्याला लागूनच असलेल्या इमारतीत भाडयाचे खोलीत चाळीस वर्षीय दशरथ छगन गोसावी हा कलाशिक्षक खासगी टयुशन चालवितात. परिसरातील तीन अल्पवयीन विद्यार्थिनींना शुक्रवारी हे शिक्षक शिकवीत असताना, त्यातील एका बारा वर्षीय इयत्ता आठवी इयत्तेतील विद्यार्थिनीच्या शरिराशी गैरवर्तन केले, याबाबत सदर प्रकार अल्पवयीन मुलीने आई वडिलांना सांगितला. त्वरीत तेथील स्थानिक ग्रामस्थांनी आई वडिलांसमवेत जाऊन चैतन्य अपार्टमेंट येथील रूममध्ये शिक्षकांस जाब विचारला. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी या शिक्षकांस चांगलाच चोप दिला व पिडीतीचे आईने याबाबत रेवदंडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. गोसावी हा शिक्षक सातारा जिल्हातील पाटण येथील आहे.