• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

माणगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का!

ByEditor

Jul 30, 2023

वडवली मोहल्यातील ग्रामपंचायत सदस्यांसह मुस्लिम बांधवांनी केला शिवसेनेत प्रवेश

सलीम शेख
माणगाव :
तालुक्यातील मांजरावणे पंचायत समिती गणातील मौजे वडवली मोहल्ला या गावातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच शिवसेना पक्षांमध्ये ढालकाटी येथील आ. भरतशेठ गोगावले यांच्या शिवनेरी या निवासस्थानी त्यांच्या व स्थानिक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

यावेळी मगदूमा हबीब हुसेन डावरे, वडवली ग्रामपंचायत सदस्य मजहर उस्मान डावरे, ग्रामपंचायत सदस्य वडवली अब्दुल डावरे, शब्बीर मांडलेकर, इब्राहिम येलुकर, नूर डावरे, अब्दुल अजीज डावरे, मनोहर डावरे, नदीम डावरे, माहीर येलुकर, फारुक कपूर, शबीर हुसेन डावरे इत्यादी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्याचे विभागातील शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख शरीफ हर्गे यांनी सांगितले. या प्रवेश कार्यक्रमासाठी शिवसेनेचे माजी सभापती सुजित शिंदे, माजी उपसभापती रामभाऊ म्हस्कर, उपतालुकाप्रमुख प्रकाश गोरीवले, विभागप्रमुख शरीफ हर्गे, उपविभाग प्रमुख ज्ञानदेव पदरात, वडवली शाखाप्रमुख हसीन फकी, दहिवली शाखाप्रमुख बळीराम पालकर, महिला तालुका संघटक अरुणा वाघमारे, युवा सेना अधिकारी फर्जंद पालेकर इत्यादी शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी प्रवेशकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शिवसेनेच्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून कार्यसम्राट आमदार भरत शेठ गोगावले” यांनी महाड विधानसभा मतदारसंघात विकास कामांचा जो धडाका लावलेला आहे तो पाहून आमच्या देखील विभागात, गावात विकास कामे व्हावीत म्हणून आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करत आहोत असे सांगितले. यावेळी आमदार गोगावले यांनी प्रवेश कर्त्यांना भगव्या पताका घालून शिवसेना पक्षात प्रवेश करून त्यांचे पक्षात स्वागत केले. तसेच आमदार गोगावले यांच्या नेतृत्वाखाली विभागात संघटनेचे आणि जनतेची कामे करण्यासाठी विविध पदाधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!