बुधवार, २६ फेब्रुवारी २०२५
मेष राशी
तुमचा उत्साह वाढविण्यासाठी सुंदर उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. दुस-यांच्या शब्दावर विसंबून तुम्ही गुंतवणूक केलीत तर आज आर्थिक तोटा होण्याची शक्यता आहे. तुमच्या कुटुंबाच्या हितासाठी उदात्त आणि फायदेशीर कार्य करण्यासाठी धोका पत्करा. हातची गेलेली संधी परत कधीच मिळत नाही हे विसरू नका आणि म्हणून घाबरू नका. वेळ, काम, पैसा, मित्र, कुटुंबीय, नातेवाईक हे सगळे एका बाजूला आणि तुम्ही व तुमचा जोडीदार दुसऱ्या बाजूला, एकमेकांत गुंफलेले. तुमच्या नियमित कष्टांचे आज चांगल चीज होईल. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात आज तुम्हाला या गोष्टीचा काही ही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणे ही पसंत करणार नाही आणि एकांतात आनंदी राहाल. प्रेम, चुंबने, मिठ्या आणि मजा, आजचा दिवस हा तुमच्यासाठी रोमँटिक असणार आहे.
भाग्यांक :- 4
वृषभ राशी
आजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौज मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे तर, आज तुम्हाला पैश्याच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तुची खरेदी संभवते. प्रेमात आज तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल, बारगळेल. आज घरात कुठल्या पार्टीमुळे तुमचा महत्वाचा वेळ बर्बाद होऊ शकतो. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत तुमच्या टीनएजमध्ये जाल, आणि त्यावेळी जी मजा केली होती, तिची उजळणी करून पुन्हा त्याचा अनुभव घ्याल.
भाग्यांक :- 4
मिथुन राशी
आजचा दिवस तुमच्यासाठी सक्रिय ऊर्जेचा उभारी देणारा नाही आणि तुम्ही छोट्या छोट्या गोष्टींमुळे त्रासून जाल. कमिशन-लाभांश- किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. मित्र आणि अनोळखी यांच्यातील फरक ओळखण्याची सावधनता बाळगा. तुमच्या प्रिय व्यक्तीला भावनिकदृष्ट्या धमकी देणे टाळा. आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. प्रवास आणि शैक्षणिक सहली यामुळे जागरूकतेत वाढ होईल. तुमच्या वैवाहिक आयुष्यात तुमचे नातेवाईक बिब्बा घालतील.
भाग्यांक :- 2
कर्क राशी
एखादे झाड जसे स्वत: उन्हातान्हात असूनदेखील दुस-यांना शीतल छाया देते, तसे आपले आयुष्य आहे.त्यामुळेच आपल्या एखाद्या मित्राने केलेली विशेष प्रशंसा ही तुमच्यासाठी आनंदाचा स्रोत असेल. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. तरुणाईचा सहभाग असणा-या उपक्रमात स्वत:ला गुंतविण्यासाठी चांगली वेळ आहे. तुमच्या प्रेमभ-या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाका. कामाच्या ठिकाणा आज तुमचा दिवस आहे! जे लोक घरापासून बाहेर राहतात आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संद्याकाळच्या वेळी कुठल्या पार्क मध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. आज तुम्हाला जाणीव होईल, की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती, ती सगळी खरी होती, तुमचा/तुमची जोडीदार ही खरंच सोलमेट आहे.
भाग्यांक :- 5
सिंह राशी
तुमच्या मनाला छळणा-या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी तुमचे बुद्धिचातुर्य आणि डावपेच वापरा. आज तुम्ही विना कुणाच्या मदतीने तुम्ही धन कमावण्यात यशस्वी व्हाल. मित्र आणि जवळचे स्नेही मदतीचा हात पुढे करतील. तुमचा प्रेमी आज तुमच्या गोष्टीला ऐकण्यापेक्षा जास्त आपल्या गोष्टी सांगणे पसंत करेल ज्यामुळे तुम्ही थोडे खिन्न होऊ शकतात. महागड्या प्रकल्पावर सही करताना तुमचा सुज्ञपणा वापरा. तुमच्या द्वारे आज रिकाम्या वेळेत असे काम केले जातील ज्या बाबतीत तुम्ही नेहमी विचार करत होता परंतु, त्या कामांना करण्यात समर्थ होऊ शकत नाही. वादविवाद किंवा कार्यालयातील राजकारण, तुम्ही या सगळ्याला पुरून उराल.
भाग्यांक :- 3
कन्या राशी
तुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात आणि तुम्हाला आज काहीतरी निराळे, अतिरिक्त असे काही करावेसे वाटेल व तुम्ही ते कराल. महत्त्वाच्या आर्थिक करारांच्या वेळी आकस्मिक विचार करून निर्णय घेऊ नका. नातेसंबंध नव्याने दृढ करण्याचा दिवस. आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे आपणास योग्य ते चीज होईल. एका पायरीवर एका वेळी महत्त्वाचे बदल केलेत तर यश निश्चितपणे तुमचेच आहे. जे लोक आत्तापर्यंत कुठल्या कामात व्यस्त होते आज त्यांना आपल्यासाठी वेळ मिळू शकतो परंतु, घरात कुठले काम येण्याने तुम्ही परत व्यस्त होऊ शकतात. तुमचे पालक तुमच्या जोडादीराला आज सुंदरशी बेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिक सुंदर होईल.
भाग्यांक :- 2
तुळ राशी
दु:खात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे नाहीतर नश्वर देहाचा उपयोग तो काय ही बाब लक्षात ठेवा. चढउतारांमुळे फायदा होईल. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. आजच्या दिवशी तुम्हाला आजुबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल. प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती घ्या. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी ज्याला तुमचा शत्रू समजत होतात, तो खरे तर तुमचा हितचिंतक आहे, याची तुम्हाला आज जाणीव होईल. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. डोळे सगळं सांगतात, आणि तुम्ही तुमच्या जोडीदाराशी आज डोळ्यात डोळे घालून संवाद साधणार आहात.
भाग्यांक :- 4
वृश्चिक राशी
आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस. तुमचे उल्हसित मन तुम्हाला योग्य ती ऊर्जा पुरवेल आणि आपणास आत्मविश्वास मिळवून देईल. धनची आवश्यकता कधी ही पडू शकते म्हणून, आज जितके शक्य असेल आपल्या पैश्याची बचत करण्याचा विचार करा. सामाजिक कार्यात सहभागी झाल्याने तुमची संध्याकाळ अपेक्षेपेक्षा चांगली जाईल. नैसर्गिक सौंदर्याने आज तुम्ही भारावून जाण्याची शक्यता आहे. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. खेळणे हा जीवनातील महत्वाचा भाग आहे परंतु, खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका की, त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणात होईल. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासमवेत व्यतित कराल.
भाग्यांक :- 6
धनु राशी
प्रदीर्घ काळापासून तुम्ही अनुभवत असलेले आयुष्यातील तणाव आणि ओढाताण यापासून थोडे मुक्त व्हाल. सगळे ताणतणाव दूर ठेवण्यासाठी तुम्ही तुमची जीवनशैली बदलायला हवी आणि हीच त्यासाठी योग्य वेळ आहे. व्यवसाय-धंद्यात उधार मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. तुमचे ज्ञान आणि विनोदबुद्धी यामुळे तुमच्या अवतीभवतीचे लोक प्रभावित होतील. प्रेमामधील तुमच्या असभ्य वर्तणुकीची माफी मागा. तुमच्या कामाच्या ठिकाणी असलेल्या वातावरणात आज सकारात्मक बदल घडेल. कायदेशीर सल्ल्यासाठी वकिलांना भेटायला चांगला दिवस. तुमचे तुमच्या जोडीदाराशी दिवसभरात भांडण होईल, पण रात्री जेवताना मात्र हे वाद मिटून जातील.
भाग्यांक :- 3
मकर राशी
वाद, संघर्ष टाळा, अन्यथा तुमच्या आजारात भर पडेल. जे लोक लघु उद्योग करतात त्यांना आजच्या दिवशी आपल्या कुठल्या ही जवळच्या लोकांचा सल्ला मिळू शकतो. ज्यामुळे आर्थिक लाभ ही मिळण्याची शक्यता आहे. आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा. आपण आखलेल्या योजना तुम्ही पार पाडू शकाल, उद्दीष्ट गाठू शकाल अशा वास्तववादी असतील याची काळजी घ्या. आपल्या पुढील पिढ्या या कामासाठी आपली सतत आठवण ठेवतील. आपल्या प्रियजनांबरोबर वेळ जाता जाणार नाही. हाती घेतलेल्या नव्या कामातून अपेक्षापूर्ती होण्याची कमी शक्यता आहे. दुसºयांना पटवून देण्याच्या क्षमतेमुळे तुम्हाला लाभ होईल. जर तुम्ही कुणालातरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारगळली तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल.
भाग्यांक :- 3
कुंभ राशी
इतरांवर टीका करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका, त्याने तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला गरजेच्या वस्तूंच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. कामाच्या ठिकाणी प्रश्न सोडविण्यासाठी तुमची बुद्धिमत्ता आणि वजन वापरण्याची गरज आहे. आज तुम्ही वेळ पाहून आपल्यासाठी वेळ काढू शकतात परंतु, ऑफिसच्या कुठल्या कामाच्या कारणास्तव अचानक तुम्ही असे करण्यात अयशस्वी ठराल. तुमच्या जोडीदाराच्या वागणूकीचा तुमच्या व्यावसायिक नात्यांवर परिणाम होऊ शकेल.
भाग्यांक :- 1
मीन राशी
परिस्थितीवर तुमचे नियंत्रण आले की तुमची चिंता नाहिशी होईल.साबणाच्या फुग्याला स्पर्श करताच तो जसा फुटून जातो तसेच हे असल्याचे तुमच्या लक्षात येईल दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केलीत तर तुम्हाला भरघोस नफा होईल. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र जोडाल. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले, की मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज या सत्याचा उलगडा होईल. कामाच्या ताणतणावांचे ढग अजूनही तुमच्या मनात साचल्यामुळे कुटुंब आणि मित्रमंडळींसाठी वेळ देता येणार नाही. गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहाल आणि आपली वेळ खराब कराल. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला प्रेम आणि संवेदनशीलतेच्या एका वेगळ्याच जगात घेऊन जाईल.
भाग्यांक :- 7