• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरणमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन

ByEditor

Mar 8, 2025

बेरोजगारांनी मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन

विठ्ठल ममताबादे
उरण :
लायन्स क्लब ऑफ पनवेल, द्रोणागिरी व उरण आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स, पनवेल व अविनाश म्हात्रे (पाले) व मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. २३/३/२०२५ रोजी सकाळी १० ते ३.३० वा. या वेळेत रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिरकोन, ता. उरण. (कृ.द. जोशी सभागृह) येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

उमेदवारांनी आपली नावनोंदणी करण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लीक करून किंवा गूगलवर सर्च केल्यानंतर येणाऱ्या नावनोंदणी अर्जाला पूर्णपणे भरून स्वतःची नाव नोंदणी करावी.

https://bit.ly/pirkonjobfair_registration या लिंक द्वारे नाव नोंदणी करावी. या मेळाव्यात विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे उमेदवारांच्या नोंदणी व प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिरकोन, ता. उरण. (कृ.द. जोशी सभागृह) या पत्त्यावर उपस्थित रहावे असे आवाहन लायन्स क्लब ऑफ पनवेल, द्रोणागिरी व उरण आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स, पनवेल व अविनाश म्हात्रे व मित्र परिवार (पाले) यांच्यावतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा.

लायन्स क्लब ऑफ पनवेल व यशस्वी ग्रुप – ला. एस. जी चव्हाण अध्यक्ष- 9372413342, ला. प्रमोद गजहंस – 9372603865, बाळकृष्ण म्हात्रे – 9324725532, समाधान जावळे – 9324725524,

लायन्स क्लब ऑफ द्रोणागिरीचे संदीप म्हात्रे – 9821142202, अविनाश म्हात्रे (पाले) व मित्र परिवारचे प्रमुख – अविनाश म्हात्रे – 9004709244 यांच्याशी संपर्क साधावा.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!