अदिती अक्षय नागावकर यांनी जिंकली पैठणी व फ्रिज
अब्दुल सोगावकर
सोगाव : अलिबाग तालुक्यातील मुनवली येथे सचिन घाडी मित्रमंडळ व सहप्रयोजक साहिल कुर यांच्या वतीने शनिवार दि. ८मार्च २०२५ रोजी संध्याकाळच्या वेळी जागतिक महिला दिनानिमित्त होम मिनिस्टर व इतर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मापगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच श्रीमती उनीता थळे व इतर मान्यवर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाला प्रसिद्ध निवेदक, अभिनेता तथा विनोदवीर अमित पाटील हे उपस्थित होते, त्यांच्या माध्यमातून महिलांसाठी प्रसिद्ध ‘होम मिनिस्टर’ व इतर अनेक उत्साह निर्माण करणाऱ्या स्पर्धा घेण्यात आल्या, अमित पाटील यांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली होती. सर्व महिलांना होम मिनिस्टर व इतर मनोरंजक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी आपल्या विनोदी कलाकौशल्याने महिलांमध्ये उत्साह निर्माण केला होता.
यामध्ये होम मिनिस्टर कार्यक्रमात सहभागी झालेल्या अदिती अक्षय नागावकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत आकर्षक पैठणी व फ्रिज जिंकला तर शुभ्रा रोशन पुजारी यांनी द्वितीय क्रमांक पटकावत स्मार्ट एल इ डी टिव्ही जिंकला तसेच शिल्पा संतोष सकरे यांनी तृतीय क्रमांक पटकावत मिक्सर जिंकला. तसेच सर्व महिलांमधून काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ मध्ये प्रथम क्रमांक विजेत्या इंद्रावती जवाहर प्रजापती यांना आकर्षक पैठणी व फ्रिज देण्यात आले, तर द्वितीय क्रमांक स्नेहा सतीश पाटील यांनी स्मार्ट एल ई डी टिव्ही देण्यात आले, तसेच तृतीय क्रमांक विजेत्या राजश्री किसन सल्लक यांना मिक्सर देण्यात आले. उत्तेजनार्थ लकी ड्रॉ मध्ये सायली रविंद्र सोलनकर यांना गॅस शेगडी देण्यात आली. यावेळी इतर स्पर्धेत जिंकणाऱ्या सर्व महिलांना मान्यवरांचे आकर्षक पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिलांना सचिन घाडी मित्रमंडळातर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
या कार्यक्रमाला रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सुनिल थळे, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच समद कुर, अनिता शिंदे, रायगड जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक उपाध्यक्ष लाईक कप्तान, माजी ग्रामपंचायत सदस्या सानिका घाडी, बहिरोळे पोलीस पाटील प्रफुल्ल थळे, संजय शिंदे, ज्येष्ठ नागरिक सुरेश राऊत, राजेंद्र घरत, संतोष बांद्रे , दिलीप मोंढे, सुधाकर ठकरुळ, वामन ठकरुळ, मधुकर सूद, किशोर नागांवकर, प्रमोद अनमाने, किशोर मोंढे, दिनकर ठकरुळ, गंगाराम ठकरुळ, सुधाकर ठकरुळ, सूचित थळे, शलाका थळे सामाजिक कार्यकर्ते सतीश घाडी, सचिन घाडी आदी मान्यवर व मापगाव पंचक्रोशीतील सर्व गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिन घाडी मित्रमंडळ मुनवलीच्या सर्व सभासदांनी व मुनवली ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.
