डॉक्टरांच्या टीमने केली नैसर्गिक प्रसुती; माता व बालके सुखरूप
सलीम शेख
माणगाव : माणगाव उपजिल्हा रुग्णालयात रोहा तालुक्यातील पुई (कोलाड) गावातील एका २३ वर्षाच्या महिलेने मंगळवार, दि. १७ मार्च २०२५ रोजी तीन बालकांना जन्म दिला असुन येथील डॉ. रामदास तरपेवाड आणि त्यांची टिम परीचारीका अनिता करकरे, परीचारीका वनिता तेटगुरे, सीक्युरीटी गार्ड वैशाली घोगरे यांनी या महिलेची नैसर्गिक प्रसुती काही अवधितच यशस्विरित्या केली. या महिलेने तीन बालकांना जन्म दिला असुन माता व बालके सुखरुप आहेत. या महिलेची डॉक्टर व त्यांच्या टिमने नैसर्गिक प्रसुती केल्याने या टिमचे रूग्णालयीन कमिटी सदस्य नरेश राजपुत यांनी विशेष कौतुक करित अभिनंदन केले असुन टिमचे सर्वत्र् कैतुक व अभिनंदन होत आहे.
रोहा तालुक्यातील पुई (कोलाड) गावची महिला मनिषा अजय कातकर (वय २३) यांना प्रसूतीसाठी रोहा तालुक्यातील खासगी रूग्णालयात नेण्यात आले होते. येथिल डॉक्टरांचा खर्च फार असल्याने नातेवाईकांनी तिला माणगाव उपजिल्हा रूग्णालयात आणले. याठिकाणी या महिलेला दाखल केल्यावर येथिल डॉ. रामदास व त्यांच्या टिमने महिलेला तपासुन काही अवधित महिलेची नैसर्गिक प्रसूती केली. या महिलेने तीन बाळांना जन्म दिला असुन पहिल्या बाळाचा जन्म दुपारी ३ वाजुन ५८ मिनीटांनी होऊन त्याचे वजन १.९ किलो ग्राम इतके भरले आहे. दुसऱ्या बाळाचा जन्म दुपारी ३ वाजुन ५९ मिनिटांनी होऊन त्याचे वजन १.३०० किलोग्राम इतके भरले आहे. तिसऱ्या बाळाचा जन्म सायं. ४ वा. होऊन त्याचे वजन १.७०० किलो ग्राम इतके भरले आहे. प्रसूतीनंतर माता व तीनही बाळांची प्रकृती व्यवस्थित असुन या महिलेची नैसर्गिक प्रसूती केल्याने माणगाव उपजिल्हा रूग्णालयाचे विशेष कौतुक होत असुन महिलेच्या नातेवाईकांनी डॉ. रामदास व त्यांच्या सर्व टिमला खास धन्यवाद देत त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
