• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगडावर पाय घसरून पडल्याने भीम अनुयायाचा मृत्यू

ByEditor

Mar 22, 2025

अमुलकुमार जैन
रायगड:
किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला वंदन करण्यासाठी आलेल्या एका भीम अनुयायीचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदरची घटना आज दुपारच्या सुमारास घडली असून भीमराव अडकुजी घायवन वय वर्ष ६४, राहणार उरळी कांचन पुणे, असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

२० मार्च रोजी पुण्याहून ४३ भीम अनुयायी महाड चवदार तळे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आले होते यानंतर हे सर्व भीम अनुयायी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन घेण्यासाठी गेले असता यातील भीमराव हे पायऱ्या उतरत असताना अचानक त्यांचा पाय घसरला व त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मयत भीमराव घायवन यांनी समता सैनिक दलाचे शिपाई म्हणून अनेक वर्ष काम केले होते. प्राथमिक आरोग्य केंद्र पाचाड रुग्णवाहिका चालक अनंत अवकीरकर यांनी सदरचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता महाड ग्रामीण रुग्णालय येथे आणण्यात आला. महाड तालुका पोलीस ठाणे येथे सदरच्या मृत्यूची नोंद करण्यात आली असून महाड तालुका पोलीस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!