विनायक पाटील
पेण : येथील डॉक्टर पतंगराव कदम कला व वाणिज्य महाविद्यालयात नूतन सीसीटीव्ही संचाचे उद्घाटन माजी प्राचार्य व अजीव सेवक सुरेश बेडगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेश पाटील व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मुरलीधर वाघ हे उपस्थित होते.
आज आपण समाजात पाहतो की सभोवताली स्त्रियांसाठी अत्यंत असुरक्षित असे वातावरण आहे, त्यामुळे काळासोबत चालताना व विद्यार्थ्यांची सुरक्षिततेचा विचार करताना मला सीसीटीव्ही आवश्यक वाटतो, असे मनोगत प्राचार्य मुरलीधर वाघ यांनी व्यक्त केले. सुरेश पाटील यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या. हा 32 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा संच महाविद्यालयाला आवश्यक ती सुरक्षा पुरवणार असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.
माजी प्राचार्य सुरेश बेडगे यांनी सीसीटीव्ही हा तिसरा डोळा असून त्याची आजच्या काळात फार उपयुक्तता आणि गरज आहे असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनायक पवार यांनी तर आभार संतोष गुरव यांनी मानले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.