अब्दुल सोगावकर
सोगाव : परशुरामांच्या पावन भूमित रत्नागिरी येथे परमपूज्य गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या दिव्य सानिध्यात भव्य महासत्संग सोहळ्याचे आयोजन मंगळवार, दि. १ एप्रिल २०२५ रोजी दुपारी ४:३० वाजता होणार आहे. तर संध्याकाळी ६:३० वाजता परमपूज्य गुरुमाऊलींचे अमृततुल्य हितगुज होणार असल्याचे अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील डॉ. किरण शेटे (कोकण विभाग प्रशासकीय प्रतिनिधी-गुरूपीठ) यांनी आमच्या प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले.
यावेळी महासत्संग सोहळा तथा विश्वशांती हेतू सामूहिक श्री स्वामीचरित्र सारामृत पठण व श्रीचक्रराज श्रीयंत्र पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम नवीन ट्रक वाहनतळ, स्टेट बँक कॉलनी जवळ, साळवी स्टॉप, रत्नागिरी येथे होणार आहे. अधिक माहितीसाठी ९७६३६९१९४९ या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.