महाड : बिहारमधून फरार झालेल्या नक्षलवाद्याला महाडमध्ये अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या नक्षलवाद्याला महाड तालुक्यातील देशमुख कांबळे या गावातून ताब्यात घेण्यात आले आहे.
बिहार स्पेशल टास्क फोर्स आणि महाड एमआयडीसी पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. या संबंधित जहाल नक्षलवाद्यावर देशद्रोहाचा व युएपीए गुन्हा दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या संदर्भात अधिकृतपणे माहिती बिहार सरकारकडून देण्यात येईल असे या पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.