रोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपीस अटक
अमुलकुमार जैन
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात एका अल्पवयीन विद्यार्थिनीच्या इच्छेविरुद्ध शिक्षकाने पाठीवर हात फिरवून मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. याबाबतची तक्रार रोहा पोलिस ठाण्यात करण्यात आली आली आहे. रोहा पोलिसांनी आरोपी शिक्षक यास अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, रोहा तालुक्यात दि. 24/03/2025 रोजी 8:30 वा.च्या सुमारास महिला फिर्यादी यांची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असुन सुध्दा फिर्यादी यांची मुलगी, शाळेला गेली असताना आरोपीत याने वर्गामध्ये शिकवत असताना फिर्यादी यांची मुलगी व तिच्या मैत्रीणी या पाठीमागील बेंचवर बसलेल्या असताना त्यांचे इच्छेविरूध्द पाठीवर हात फिरवून मनामध्ये लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला. सदर गुन्ह्यातील आरोपीस दिनांक 27/03/2025 रोजी 22:58 वा. च्या सुमारास अटक करण्यात आली आहे.
याबाबत रोहा पोलीस ठाणे गुरनं. 63/2025, बाल लै. अत्या. संरक्षण (POCSO) अधिनियम, 2012 चे कलम 8,12, भारतीय न्याय संहिता 74,79 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोसई एस. खतिब हे करीत आहेत.