टेमपाले गावातील समस्या सोडविणार -खा. सुनील तटकरे
सलीम शेख
माणगाव : तालुक्यातील टेमपाले गावातील शेकडो कार्यकर्ते व ग्रामस्थांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी देत रायगड – रत्नागिरी लोकसभा मतदार संघाचे खा. सुनील तटकरे यांच्या कार्य प्रणालीवर विश्वास ठेवीत तालुक्यातील गोरेगाव येथील प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पक्षाचे कार्यकारणी सदस्य मुक्तार वेळासकर व गोरेगाव सरपंच जुबेर अब्बासी यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दि. ६ एप्रिल २०२५ रोजी सुतारवाडी येथे खा.तटकरे यांच्या बंगल्यावर सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा स्वगृही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमास प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पक्षाचे कार्यकारणी सदस्य मुक्तार वेळासकर,पक्षाचे जिल्हा युवक कार्याध्यक्ष शादाब गैबी व गोरेगाव सरपंच जुबेर अब्बासी उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे टेमपाले गावात उबाठा शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.

सुतारवाडी येथे झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना खा.सुनील तटकरे यांनी सुरवातीला प्रवेशकर्ते सर्व मुस्लिम बांधव-भगिनींना रमजान ईदच्या शुभेच्छा देत त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पक्षात स्वागत केले. खा.तटकरे पुढे म्हणाले कि, संसदेचे अधिवेशन सुरु असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या समवेत माझी मुंबई-गोवा महामार्गाच्या कामासंदर्भात चर्चा झाली. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा नेते असून ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. जरी आपण एनडीएमध्ये सामील झालो असलो तरी आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही. धर्मनिरपेक्ष विचार घेऊन सर्वधर्म समभाव मानून आम्ही बहुजन समाजात काम करीत आहोत. अल्पसंख्यांक समाजासाठी असणाऱ्या मौलाना अबुल कलाम आझाद आर्थिक विकास महामंडळ अधिकतम बळकट करण्याचा प्रयत्न केला. मी आज बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या आशीर्वादाने इथपर्यंत पोहोचलो आहे. माझी कन्या राज्याची महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून राज्यातील २ कोटी ४२ लाख महिलांना या योजनेचा लाभ मिळवून दिला. टेमपाले गावातील क्रॉसिंग, रस्ते, पाणी अशी जी काही कामे असतील ती आपण प्राधान्याने करू असे खा. तटकरे यांनी प्रवेशकर्त्यांना आश्वासित करताना सांगितले.
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पक्षाचे कार्यकारणी सदस्य मुक्तार वेळासकर यांनी यावेळी बोलताना खा.तटकरे साहेब हे रात्री अपरात्री केव्हाही आपल्या सर्वांच्या कामासाठी तत्पर असतात. त्यांच्यासारख्या नेत्याला ताकद देणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य असल्याचे सांगून त्यांनी तटकरे यांच्या कार्याचा गौरव केला.
प्रवेशकर्ते जमातुल मुस्लिमीन टेमपाले गावचे अध्यक्ष अजीज गजगे म्हणाले कि, यापूर्वीही आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच होतो. टेमपाले गावातील विकासकामे खा.तटकरे साहेबांच्या माध्यमातून झाली असून यापुढील कामेही तेच करतील असा विश्वास उपस्थित आम्हा सर्व गावकऱ्यांना असून येणाऱ्या सर्वच निवडणुकांत तसेच कायमस्वरूपी तटकरे साहेबांसोबतच राहू असा शब्द गजगे यांनी दिला.
यावेळी जमातुल मुस्लिमीन टेमपाले गावचे अध्यक्ष अजीज गजगे,उपाध्यक्ष अजीज अलसुरकर, गणी लोखंडे, सलीम अलसुरकर, सुहेब अलसुरकर, निसार इस्माईल सेन, सज्जाद गजगे, अमान अलसुरकर, निसार सेन, साजिद खानदेशी, मुफ्ती मुजफ्फर सेन, मुक्तार गजगे, जहीर अलसुरकर, साजिद गोडमे, गुलाम अलसुरकर, सौदाबी सेन, नूरजहान सेन, खतिजा दाखवे, नुसरत खानदेशी, रशिदा सेन, तहसीन अलसुरकर यांच्यासह टेमपाले गावातील शेकडो महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी खा. सुनील तटकरे यांच्या विकासकामांनी भारावून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवतं राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार गट) पक्षात खा. सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

या पक्षप्रवेश कार्यक्रमात खा.सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची रायगड जिल्हा अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष नाझीम हसवारे यांनी पक्षाच्या दक्षिण रायगड जिल्हा अल्पसंख्यांक सेल उपाध्यक्षपदी अब्दुल अजीज गजगे, सचिवपदी अ. गणी दाऊद लोखंडे तर लोणेरे विभाग अल्पसंख्यांक सेल अध्यक्षपदी मुक्तार गजगे यांची नियुक्ती करून या सर्वांना नियुक्तीपत्र खा. सुनील तटकरे यांनी आपल्या हस्ते देऊन त्यांचे अभिनंदन केले.
