विश्वास निकम
कोलाड : रोहा तालुक्यातील कोलाड गावच्या हद्दीत मंगळवार, दि. ८/४/२०२५ रोजी २०.३० वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावर रोहा कोलाड अप रेल्वे लाईनवर इलेक्ट्रिक पोल नं.१०/२७ जवळ पुगांव येथील रहिवाशी पंढरीनाथ बबनराव देशमुख (वय ५८) यांना कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मडगांव लोकमान्य टिळक एक्सप्रेसनी धडक दिल्याने या धडकेत त्यांचा मृत्यू झाला असुन त्यांना रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले असता येथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
सदर घटनास्थळी कोलाड पोलिस ठाण्याचे सपोनि नितीन मोहिते यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत भेट दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कोलाड पोसई एन. एन. चौधरी, एन. झेड. सुखदेवे हे अधिक तपास करीत आहेत.
