नागोठणे : नागोठण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्माकर कृष्णनाथ पोवळे यांचे वृद्धापकाळाने ठाणे येथे निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. दैनिक सामनाचे वृत्त संपादक राजेश पोवळे यांचे ते वडील होत.
पद्माकर पोवळे यांचे मुळ गाव नागोठणे होत, ते धार्मिक वृत्तीचे व मनमिळाऊ स्वभावाचे होते. पद्माकर पोवळे यांनी पोस्ट खात्यात प्रदीर्घ सेवा केल्यानंतर ते निवृत्त झाले होते. यानंतर ते काही काळ ठाणे येथे राहत होते.
सोमवारी सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना त्वरित रूग्णालयात दाखल केले पण त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यांच्या पार्थिवावर सायंकाळी जवाहर बाग येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पुत्र राजेश, निलेश, विवाहित कन्या दिपाली पैठणकर, सुना जावई नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचा दशक्रिया विधी बुधवार १६ एप्रिल रोजी तर उत्तर कार्य शनिवार १९ एप्रिल रोजी ठाणे येथील राहत्या घरी होणार असल्याची माहिती पोवळे कुटुंबियांकडून देण्यात आली.