• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

वर्षा जांबेकर यांना राज्यस्तरीय निःस्वार्थ समाजसेविका पुरस्कार

ByEditor

Apr 21, 2025

विश्वास निकम
कोलाड :
रोहा तालुक्यातील आमडोशी येथील बँक सखी वर्षा वासुदेव जांबेकर यांना राज्यस्तरीय निःस्वार्थ समाजसेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला. इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन, आपली मुंबई न्यूज व निर्मलरत्न चॅरिटीबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने रविवार, दि. २० एप्रिल २०२५ रोजी ए /सी क्लब हाऊस, लोढा आमरा कोलशेत, ठाणे पश्चिम येथे पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी कर्नल रविंद्र त्रिपाठी, सिनेमास्टार प्राची जैन, सुप्रसिद्ध अभिनेत्री साक्षी नाईक, मॉडरेटर ज्योती सनये, सेव्हन वंडर्स रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्डचे दिगंबर तायडे, उद्योगपती बिल्डर अशोक जैन, न्यायिक सल्लागार वैद्यकीय मदत कक्ष धनाजी पवार, रिटायर्ड डीसीपी मुंबई सिताराम न्यायनिर्गुणे, महिला उद्योजक कामिनी भोसले, संस्थापक अध्यक्ष दक्ष नागरिक पोलीस मित्र महाराष्ट्र राज्य राजेश भोसले, चार्टर अकाउंटंट ऋषभ वोरा, सोशल वर्कर अनिता गुप्ता आदी मान्यवरांच्या उपस्थितीत वर्षा जांबेकर यांना हा पुरस्कार देण्यात आला.

वर्षा जांबेकर या बँक सखी म्हणून काम करीत असुन ऐनघर पंचक्रोशीत तसेच नागोठणे विभागातील विविध प्रकारचे महिला बचत यांना मोलाचे सहकार्य करीत आहेत. तसेच विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यात त्या नेहमीच सक्रिय असतात. यामुळे त्यांना विविध क्षेत्रातील तीन पुरस्कार मिळाले आहेत. तर ठाणे येथे त्यांना निःस्वार्थ समाजसेविका राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले असुन त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात होत आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!