घन:श्याम कडू
उरण : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत म्हणून संबोधले जाणारे माजी जिल्हाप्रमुख बबनदादा पाटील यांची शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उपनेतेपदी बबनदादा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. आज सामना या वृत्तपत्रात बबनदादा पाटील यांची उपनेतेपदी निवड झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. माजी जिल्हाप्रमुख बबनदादा पाटील यांची उपनेतेपदी निवड जाहीर होतात त्यांच्यावर रायगड जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
