• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

उरण-भेंडखळची सुकन्या डॉ. ज्युतिका योगिता कैलास भोईर हीने पटकाविला पहिली डॉक्टरेट मिळविण्याचा मान

ByEditor

Aug 3, 2023

घनःश्याम कडू
उरण :
भेंडखळमधील सुकन्या कुमारी डॉ. ज्युतिका योगिता कैलास भोईर हीने गावात पहिली डॉक्टरेट मिळविण्याचा मान पटकावून भेंडखळ गावाचे नाव उज्वल केले आहे. सातासमुद्राचे पार दुबई येथे फोकस लॉजिस्टीक कंपनीमध्ये कोऑर्डीनेटर या पदावर काम करत असताना आपले काम सांभाळून लॉजिस्टीक अँड सप्लाय चेन मॅनेजमेंट फिल्डमध्ये Ph.d. ची पदवी संपादन केल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तिने मेहनतीने कॅनडामधील IATA कार्गो डिप्लोमा, KHDA दुबईचे लॉजिस्टीक आणि सप्लाय चेन स्पेशिलायझेन आणि CIPD इन्स्टिटयुशन लंडनकडून पोर्ट वेअरहाऊस आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट डिप्लोमा आणि एअरपोर्ट मॅनेजमेंट डिप्लोमा अशा विविध परिक्षा प्रथम श्रेणीसह उत्तीर्ण होवून प्रमाणपत्र प्राप्त केली आहेत. याबाबत तिने मनोगत व्यक्त करताना याचे सर्वस्वी श्रेय तिच्या आई वडिलांना देवून मुली असून सुद्धा माझ्यासह माझ्या छोट्या बहिणीला जॉब करण्यासाठी परदेशात पाठविताना कुठल्याही प्रकारे आडेवेडे न घेता आमच्यावर विश्‍वास व्यक्त केल्याने खरच आम्हाला त्यांचा नक्कीच अभिमान वाटत आहे.

याबाबत त्यांच्या आई वडिलांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी दोन्ही मुलींच्या बाबतीत संत तुकाराम महाराज यांच्या अभंगातील दोन ओळींचा
आधार घेत धन्य झालो या संसारी आम्ही देखीली पंढरी, अशा आपले भाव प्रगट केले. कारण आम्हाला बरेच लोक बोलत होती की, अरे मुलींना कशाला बाहेर पाठवता पण आमच्या मनात एकच होते की, त्यांनी मेहनत करून आपले करियर करायचे आहे आणि त्यासाठी त्यांना पाठींवा देणे आवश्यक आहे आणि असे सर्व मुलींच्या बाबतीत आई वडिलांनी त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणे आवश्यक असे वाटते.

By Editor

2 thoughts on “उरण-भेंडखळची सुकन्या डॉ. ज्युतिका योगिता कैलास भोईर हीने पटकाविला पहिली डॉक्टरेट मिळविण्याचा मान”
  1. I am really loving the theme/design of your site. Do you
    ever run into any browser compatibility issues? A couple of my blog readers
    have complained about my blog not working correctly in Explorer but looks
    great in Safari. Do you have any advice to help fix this issue?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!