• Wed. Jan 28th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

ट्रॅव्हलरने सायकलस्वारासह दोन पादचाऱ्यांना उडवले; तिघांचा जागीच मृत्यू

ByEditor

May 6, 2025

प्रतिनिधी
माणगाव :
शहरातील मोर्बा मार्गावरील उपजिल्हा रुग्णालयासमोर मंगळवारी (दि. 6) भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात मृत झालेल्यांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. दिनेश शेलार, दिपीका शेलार आणि वामन पवार (सर्व राहणार माणगाव) अशी त्यांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोर्बा-माणगाव मार्गावर सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास एका भरधाव ट्रॅव्हलरची सायकल, पोलीस जीप आणि दुचाकीला धडक बसून भीषण अपघात झाला. उपजिल्हा रुग्णालयासमोरील मार्गाच्या एका बाजूने सायकलवरून जात असलेले खांदाड येथील वामन पवार व पाचोळे येथील दिनेश शेलार, दिपीका शेलार यांना जोरदार भीषण धडक दिली. या धडकेने वामन पवार व दिपीका शेलार रस्त्याच्या बाजूला उडाले गेले. तर, दिनेश शेलार यांना 20 फूट फरफटत नेत फुटपाथवर चढत सुकी मच्छि व्यवसाय करणाऱ्या दुकानाला आणि दुचाकी वाहनाला धडक दिली. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली होती. अपघाताची माहिती कळताच माणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बेदरकारपणे चालवणारा वाहनचालक फुटपाथवर गाडी चढवून फरार झाला.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!