प्रतिनिधी
नागोठणे : नागोठणे विभाग शासकीय व निमशासकीय सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेची मासिक सभा बुधवार, दि. 7 मे 2025 रोजी राजन उपाध्ये यांचे निवासस्थानी पार पडली. या सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली, ज्यात संघटनेच्या कार्याचा आढावा, सदस्यांच्या समस्या आणि भविष्यातील योजनांचा समावेश होता. सभेला मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली आणि त्याचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी काही सदस्यांनी संघटनेच्या कार्याचा गौरव केला आणि भविष्यात अधिक प्रभावी कार्य करण्यासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.
या सभेत संघटनेचे ज्येष्ठ कर्मचारी सभासद रामभाऊ भागोजी शिर्के (रा. कडसुरे) यांच्या वयाला 85 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. त्यांनी रोहा तालुक्यात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी म्हणून सेवा केली आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दत्ताराम झोलगे, उपाध्यक्ष दामोदर भोईर, सहसचिव नरेंद्र सोष्टे, के. के. कुथे, जयराम पवार, उल्हास नागोठकर, सुरेश जांबेकर यांच्यासह सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
