नराधम विलास गुलालकर याच्या विरोधात गुन्हा दाखल
मिलिंद माने
महाड : तालुक्यातील एका ५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना महाड तालुक्यातील ईशाने कांबळे गावातील ऐश्वर्या हेअर कटिंग सलूनमध्ये घडली.
महाड तालुक्यातील औद्योगिक वसाहती जवळील ईशाने कांबळे गावातील पाच वर्षीय एका चिमुरड्या मुलीला १४ मे रोजी दुपारी खाऊला पैसै देण्याच्या निमित्ताने ऐश्वर्या हेअर कटिंग सलूनमध्ये बोलावून घेतले आणि तिथे तिच्यावर विलास पांडुरंग गुलालकर याने लैंगिक अत्याचार केले. हा आरोपी मूळ राहणार वरंडोली नाते विभागातील आहे. त्याच्या विरोधात महाड महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय सहिता २०२३ चे कलम ६४(२) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून सरंक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४(२), ५(m) ६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक संतोष जाधव, पोलीस सह निरीक्षक श्री. व्ही. राऊत करत आहेत. या माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेचा निषेध महाड तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात होत आहे