• Thu. Jun 19th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

पेण प्रायव्हेट हायस्कूलचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश!

ByEditor

May 16, 2025

९७.२९ टक्के निकाल; आर्यन पाटील प्रथम, पार्थ घरत द्वितीय तर कुणाल पाटील तृतीय

विनायक पाटील
पेण :
पेण एज्युकेशन सोसायटी पेण येथील प्रायव्हेट हायस्कूल पेण एसएससी परीक्षेत फेब्रुवारी/मार्च २०२५ मध्ये बसलेल्या १४८ विद्यार्थ्यांपैकी १४४ विद्यार्थी पास होऊन शाळेचा निकाल ९७.२९ टक्के लागला आहे.

या प्रशालेत उच्च श्रेणीत १९, प्रथम श्रेणीत ५०, द्वितीय श्रेणीत ५१ तर तृतीय श्रेणीत २४ विद्यार्थी पास होऊन शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. गुणानुक्रमे प्रथम आलेले पाच विद्यार्थी प्रथम क्रमांक आर्यन अंकूश पाटील ४३९/५०० (८७.८०%), द्वितीय क्रमांक पार्थ राजकुमार घरत ४३२/५०० (८६.४०%), तृतीय क्रमांक कुणाल दिनकर पाटील ४२९/५०० (८५.८०%), चतुर्थ क्रमांक स्वरूप कैलास भोईर ४२६/५०० (८५.२०%), पाचवा क्रमांक ओंकार विकास लांगी ४२५/५०० (८५%) असे गुण मिळवून यश संपादन केले आहेत. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. मंगेश नेने, कार्याध्यक्ष प्रशांत ओक, उप कार्याध्यक्ष संजय कडू, सेक्रेटरी सुधीर जोशी व सर्व संचालक मंडळ, प्राचार्या अंजली जोशी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व पालकांनी अभिनंदन केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!