खोपोली : खोपोलीत तीन बांगलादेशी महिलांना अटक करण्याची घटना समोर आली आहे. सलिना शेख (वय ३०), नजमा फकीर (वय ३०) आणि पॉपी शेख (वय २४) या महिलांनी भारत-बांगलादेश सीमारेषा बेकायदेशीरपणे पार केल्याचा आरोप आहे.
जामरील डांगा, कालीया थाना, जि. नाराईल, बांगलादेश येथील या महिलांनी कोणत्याही वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय अवैध मार्गाने भारत-बांगलादेश सीमेवरून लपत छपत भारतात प्रवेश केला. खोपोलीतील मिळ गावात वरिल तीन महिला राहात असल्याची गुप्त माहिती खोपोली पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी छापा टाकत त्यांना ताब्यात घेतले, आणि चौकशीत कोणत्याही वैध ओळखपत्रांशिवाय भारतात वास्तव्य करत असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी भारतीय कायद्यांच्या उल्लंघनाविषयी अधिक तपास सुरू केला असून, त्यांचा प्रवेश आणि वास्तव्याचा हेतू स्पष्ट करण्यासाठी पुढील चौकशी करण्यात येत आहे. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पोलिस निरीक्षक शितल राऊत, पोलिस शिपाई स्वप्नील दीपक लाड, प्रणित कळमकर यांनी गावात छापा टाकून तिघींना ताब्यात घेत चौकशी केली. त्या वेळी भारतीय नागरिक असल्याबाबत कोणतेही वैध कागदपत्रे त्यांच्याजवळ आढळून आली नाहीत.