सलीम शेख
माणगाव : मोटरसायकल स्लिप होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना कुंभार्ते गावच्या बस स्टॉपजवळ घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. १६ मे रोजी रात्री ९.१५ वा.च्या सुमारास मयत संतोष लक्ष्मण लमानी (वय ४०) हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल (क्र. एमएच ०६ बीक्यु १४३२) चालवित असताना कुंभार्ते गावच्या बस स्टॉपजवळ आल्यावेळी रोडच्यामध्ये कुत्रा आल्याने जोरात ब्रेक केला असता मोटारसायकल स्लिप होवून अपघात झाला. या अपघातात मोटरसायकल चालक यांचा मृत्यू झाला असून गाडीचे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृत्ती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत.