• Sun. Jun 22nd, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

अभिजित पाटील यांची मुक्त विद्यापीठाच्या तज्ञ समितीमध्ये निवड

ByEditor

May 31, 2025

अलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित सुरेश पाटील यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पतसंस्था व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम तज्ञ सल्लागार समितीमध्ये निवड करण्यात आली आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिकच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखे अंतर्गत पतसंस्था व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम सुरू करण्यात येणार आहे. शिक्षणक्रमाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. विषयनिहाय अभ्यासक्रम तयार करण्यात येत आहेत. या शिक्षणक्रमाच्या प्रत्येक विषयासाठी विषय तज्ञांची नेमणूक करण्यात आली आहे. पतसंस्था आणि आधुनिक तंत्रज्ञान या विषयासाठी तज्ञ सल्लागार समिती निवडण्यात आली आहे. प्रा. मनीष देशमुख हे या समितीचे अध्यक्ष आहेत. तज्ञ सल्लागार समितीमध्ये आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अभिजित पाटील तसेच उत्तम गाडगे, संदीप कोयटे सदस्य आहेत.

अभिजित पाटील मागील तीन वर्षांपासून आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. दक्षिण कोरियामध्ये झालेल्या आशिया खंडातील सहकारी पतसंस्थांच्या प्रशिक्षण शिबिरासाठी त्यांची निवड झाली होती. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्थांचा महासंघातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये तंत्रज्ञान या विषयावर ते व्याख्यान देण्यासाठी जात असतात.

अभिजित पाटील यांच्या सहकार क्षेत्रातील योगदान व ज्ञानाचा अभ्यासक्रम तयार करतांना उपयोग व्हावा व हा शिक्षणक्रम संपूर्ण महाराष्ट्रातील सहकारात कार्य करू इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचावा, या अनुषंगाने तज्ञ म्हणून त्यांची यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या तज्ञ सल्लागार समितीमध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील तसेच सर्व संचालकांनी अभिजित पाटील यांचे अभिनंदन केले.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!