• Tue. Jan 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

कार्ले नदीपात्रात रेजगा माफियांची दहशत

ByEditor

May 31, 2025

रेजग्याच्या उपशामुळे पाणीप्रश्न बनला गंभीर

बोर्ली ग्रामपंचायतीची तहसीलदारांकडे तक्रार; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

गणेश प्रभाळे
दिघी :
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन शहरावर सद्या पाणी संकट आले आहे. रस्त्याच्या कामात कोंढेपंचतन धरणातून येणारी पाईपलाईन फुटल्याने पाणी पुरवठा होत नाही. तर दुसरीकडे कार्ले नदीपात्रातून रेजगा उपशामुळे पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीकडून रेजगा उपसा करणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

कार्ले नदीपात्रातून बोर्लीपंचतन, दिवेआगर व भरडखोल या गावांना वर्षानुवर्षे सुरळीत पाणीपुरवठा मिळत आहे. मात्र, मागील दिवसात येथील पाणी साठवलेल्या विहिरींच्या परिसरात रेजगा माफियांकडून बेसुमार उपसा होत आहे. त्यामुळे नदीपात्रात खोल खड्डे तयार झाले आहेत. त्यामूळे साठवणूक केलेल्या विहिरीतील पाणी नदीत मिसळत आहे. एकूणच गढूळ पाण्यासह जलस्त्रोत असलेल्या पाणी पातळीला धोका निर्माण झाल्याने बोर्लीपंचतन शहराचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे.

बोर्ली ग्रामपंचायतीकडून दि. 13 मे रोजी रेजगा उपसा करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी यासाठी तहसीलदारांकडे तक्रार करण्यात आली. मात्र, अठरा दिवस उलटूनही अद्याप कोणतीही कारवाई न झाल्याने रेजगा माफियांची दहशत वाढत आहे. या दुर्लक्षतेमुळे शासनाचा लाखोंचा महसूल बुडत असून, ऐन पावसाळ्यात बोर्लीकरांच्या वाटेला पाण्यासाठी वणवण सुरू झाली आहे.

कार्ले नदीतील बेकायदा खनिज उपसा थांबवण्यासाठी निवेदन देण्यात आले आहे. लवकरच करवाई करण्यात यावी अशी ग्रामपंचायतीची मागणी आहे.
-शंकर मयेकर,
ग्रामसेवक.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!