सायबर ठग तुषार वाजंत्रीस पनवेल येथे अटक
वडील तटकरेंचे विश्वासू कार्यकर्ते; कोकबन तंटामुक्ती समितीचे दहा वर्षाहून अधिक काळ अध्यक्ष
पत्नी सरपंच आणि सायबर भामटा राष्ट्रवादीचा पदाधिकारी
अमुलकुमार जैन
अलिबाग : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार हे गेल्या काही महिन्यांपासून पक्षातील काही नेते पदाधिकारी यांच्या कृत्यामुळे अडचणीत येत असल्याचे पाहावयास मिळत आहे. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामधील वाल्मीक कराड, पशु संवर्धन विभागाचे माजी मंत्री धनंजय मुंडे, पुणे येथील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पक्षाचे पदाधिकारी असलेले राजेंद्र हगवणे आणि कुटुंबीय, पुण्यातील अल्पवयीन मुलीच्या बलात्कार प्रकरणात अटकेत असलेला शंतनू कुकडे आणि शंतनू कुकडे बरोबर आर्थिक व्यवहार असणारे माजी शहराध्यक्ष दीपक मानकर. या सगळ्या नेत्यांमुळे अजित पवारांच्या अडचणी वाढल्या होत्या. त्यातच भर म्हणून आता अजित पवारांच्या रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा रोहा तालुक्याचा एक पदाधिकारी आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचे कट्टर कार्यकर्ते तथा रोहा तालुका उपाध्यक्ष हरिश्चंद्र वाजंत्री यांचा पुत्र, कोकबन सरपंच यांचा पती तथा राष्ट्रवादीचा पदाधिकारी असणारा तुषार वाजंत्री यांनी केलेले कुकृत्य समोर आले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांच्या समवेत अजित पवार हे परत एकदा चर्चेत आले आहेत.
तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (वय २८, रा. कोकबन, ता. रोहा, जि. रायगड) याने पुण्यातील एका ज्येष्ठाला ९ ते १९ नोव्हेंबर २०२४ दरम्यान अनोळखी व्हॉट्सअॅप क्रमांकावरून फोन करून पोलीस असल्याची खोटी माहिती देत त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्या विरोधात मनी लॉंड्रिंगची केस असल्याचे सांगितले. तसेच चौकशीच्या बहाण्याने डिजिटल अरेस्ट करून ज्येष्ठाला पैसे पाठविण्यास सांगितले. बळी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकांना पोलिस अधिकाऱ्यांसारख्या व्यक्तीकडून व्हाट्सएपद्वारे अनेक कॉल प्राप्त झाले. कॉलरने खोटा दावा केला आहे की, पीडित एक मनी लॉंडरिंग प्रकरणात गुंतलेला होता आणि प्रश्न विचारण्यासाठी “डिजिटलरित्या अटक करण्यात आला” होता. धोक्यांचा वापर आणि गुन्हा नोंदवण्याच्या दबावामुळे, फसवणूककर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर खात्यात पैसे हस्तांतरित करण्यात यश मिळविले होते. पीडित ज्येष्ठाने वाजंत्री याला तब्बल ६ कोटी २९ लाख रुपये पाठविले. मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर ज्येष्ठाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मनी लॉड्रिग व्यवहारात डिजिटल अटक करण्याची भीती दाखवून पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची तुषार वाजंत्री याने ६ कोटी २९ लाखांची फसवणूक केली होती. या प्रकरणी या सायबर चोरट्याला पनवेल परिसरातून अटक करण्यात आली असून त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. इतकेच नाही तर तो विविध राज्यांमध्ये पाच सायबर गुन्ह्यामध्ये सहभागी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आता वाजंत्रीच्या अडचणीत वाढ झाली असून वाजंत्री कुटुंबाचे राजकीय कनेक्शन सुद्धा समोर आले आहे.
तुषार वाजंत्री याचे वडील हरिश्चंद्र वाजंत्री हे राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहा तालुका उपाध्यक्ष आहेत. तुषारची पत्नी तेजस्विनी वाजंत्री ही कोकबेन या गावची राष्ट्रवादी काँग्रेसची सरपंच आहे. इतकंच नाही तर हे वाजंत्री कुटुंब सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्या प्रचारात हे कुटुंब सर्वात पुढे होते.
वाजंत्री कुटुंबाचे इतर सुद्धा काही काळे धंदे असल्याची माहिती समोर आली आहे. पेशाने बांधकाम व्यावसायिक असणारं हे कुटुंब जुगाराच्या काळ्या धंद्यात सुद्धा तितकंच पुढे असल्याची माहिती मिळाली आहे. राजकीय वरदहस्ताने रायगड जिल्ह्यात जुगाराचे क्लब सुद्धा वाजंत्रीचे असल्याची माहिती आहे. मात्र स्थानिकांनी अनेकदा तक्रार करून सुद्धा यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळेच बड्या राजकीय नेत्यांच्या वरदहस्ताखाली हे वाजंत्री कुटुंब आपले काळे कारनामे करतंय का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
सायबर पोलिसांना ती रक्कम वाजंत्रीच्या खात्यात जमा झाल्याचे उघडकीस आणले. आरोपीने त्यातील 90 लाख आणि 20 लाख रुपये एका बँकेत मुदतठेव स्वरूपात ठेवले होते. संबंधित बँक खाते कोकबन येथील धावीर कन्स्ट्रक्शनचे असल्याचे उघड झाले. त्यानंतर सायबर पोलिसांचे पथक आरोपी आणि साथीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकबन येथे आल्याची चाहुल लागताच तो पसार झाला. वाजंत्री पनवेलमध्ये असल्याची माहिती खबऱ्याने दिल्यावर सापळा लावून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती आहे.
पोलिस (गुन्हेगारी) पंकज देशमुख यांनी सांगितले की, 1 नोव्हेंबर आणि 19 नोव्हेंबर, 2024 दरम्यान तक्रार दाखल करण्यात आली होती, बळी पडलेल्या एका ज्येष्ठ नागरिकांना पोलिस अधिकाऱ्यांसारख्या व्यक्तीकडून व्हाट्सएपद्वारे अनेक कॉल प्राप्त झाले. त्या कॉलरने खोटा दावा केला आहे की, पीडित एक मनी लॉंडरिंग प्रकरणात गुंतलेला होता आणि प्रश्न विचारण्यासाठी डिजिटलरित्या अटक करण्यात आला होता. धोक्यांचा वापर आणि गुन्हा नोंदवण्याच्या दबावामुळे, फसवणूककर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर खात्यात पैसे हस्तांतरित करण्यात यश मिळविले.
आरोपी तुषार वाजंत्री याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. तेव्हा न्यायालयाने त्याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीविरुद्ध वेगवेगळ्या राज्यात ‘नॅशनल सायबर पोर्टल’वर एकूण पाच तक्रारी आहेत. या पाच गुन्ह्यात वाजंत्री याचा सहभाग असल्याचे उघडकीस आणण्यात सायबर पोलिसांना यश आले आहे. केरळ पोलीसही या आरोपींच्या मागावर होते. सायबर पोलीस केरळ पोलिसांच्या संपर्कात राहून या आरोपींचा शोध घेत होते. पोलीस वाजंत्रीच्या साथीदाराचा शोध घेत आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस अंमलदार राजुदास चव्हाण, मुंढे, कोंडे, बाळासो चव्हाण, जान्हवी भडेकर, संदिप पवार, संदिप यादव, सचिन शिंदे, सतिश मांढरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
पोलिस उपायुक्त (आर्थिक आणि सायबर गुन्हा विंग) विवेक मासल म्हणाले, 11 नोव्हेंबर, 2024 रोजी, पीडिताच्या खात्यातून 20 लाख रुपयांची रक्कम श्री धावीर कन्स्ट्रक्शनच्या नावाखाली नोंदणीकृत एचडीएफसी बँक खात्यात 20 लाख रुपये हस्तांतरित करण्यात आली. रोहा तालुक्यातील कोकबन गावात पुढील ट्रॅकिंगने दाखवून सांगितले की, आरोपीने 10 लाख रुपये आणि फसवणूकीच्या निधीतून 20 लाख रुपये ठेवींची रक्कम तयार केली.
पोलिसांनी आरोपी तुषार हरिश्चंद्र वाजंत्री यांना अटक केली आहे. त्याचे वडील हरिश्चंद्र वाजंत्री सध्या फरार आहेत.