सलीम शेख
माणगाव : शिवराज्याभिषेक कार्यक्रमावरून येताना निजामपूर विभागातील मौजे शिरसाट गावच्या हद्दीत क्रूझर व मोटरसायकलचा अपघात होऊन ५ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. ६ जून रोजी आरोपी चांगदेव हांडे {वय ४३, रा. लांबोटी, जि. सोलापूर) त्याच्या ताब्यातील क्रुझर जीप क्र. एमएच १३ एझेड ८१९६ घेवुन शिवराज्याभिषेकाचा कार्यक्रम आटोपुन निजामपुर मार्गाने ताम्हाणी मार्गे पुणे सोलापुर येथे जात असताना दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास मौजे शिरसाट गावचे पुढे आलेवेळी समोर चाललेल्या गाडीला ओव्हरटेक करीत असताना निजामपुर बाजुकडून येणारी मोटारसायकल क्र. एमएच १२ एक्सजे २४८१ ला ठोकर मारुन अपघात केला. या अपघातामध्ये मोटारसायकलवरील किरण सुरेश मराठे, मायव संजय जळपटे या दोघांना गंभीर दुखापती झाल्या असुन क्रूझर जीप गाडीतील ३ जण जखमी झाले आहेत. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक निवृती बोऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुणतुणे करीत आहेत.
