अलिबाग (क्रीडा प्रतिनिधी) : रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन आणि झुंझार युवक मंडळ, पोयनाड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय पुरुष खुल्या गटातील कॅरम स्पर्धेचे आयोजन शनिवार, १९ जुलै व रविवार, २० जुलै २०२५ रोजी जय मंगल कार्यालय, पांडवादेवी-पोयनाड येथे करण्यात आले आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या रायगड जिल्ह्यातील कॅरमपटूंनी शुक्रवार, ११ जुलै २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खालील प्रतिनिधींशी संपर्क साधून आपली नावे स्पर्धा शुल्कासह नोंदवावीत:
प्रतिनिधीचे नाव | संपर्क क्रमांक | ठिकाण |
दिपक साळवी | ७०२०६०२३३५ | पोयनाड |
सचिन नाईक | ८८५०४६२४११ | पनवेल |
पांडुरंग पाटील | ७२७६३४७०१३ | कर्जत |
प्रदीप वाईंगडे | ९७७३१८३०३० | कामोठे |
अमित यादव | ९९६९६०८२८० | रसायनी |
या स्पर्धेसाठी “सुरको किंग” कंपनीचे कॅरम बोर्ड वापरण्यात येणार असून स्पर्धेनंतर हे बोर्ड विक्रीसाठी उपलब्ध असतील, याची नोंद कॅरम प्रेमींनी घ्यावी.
स्पर्धेसाठी एकूण ₹२५,००० रोख बक्षिसे आणि आकर्षक चषक ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक सहभागी खेळाडूसाठी दुपारच्या भोजनाची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात येणार आहे.
सर्व खेळाडूंना आवाहन जिल्ह्यातील जास्तीत जास्त कॅरमपटूंनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कॅरम असोसिएशनचे सचिव दिपक साळवी यांनी केले आहे.