किरण लाड
नागोठणे: मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. कासु ते आमटेम या भागात साधारण ४ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आमटेम गावाजवळ महामार्गावर टँकर नादुरुस्त झाल्याने ही वाहतूक कोंडी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. महामार्ग पोलीस व वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
