विनायक पाटील
पेण : महावितरण विभागातील उपकार्यकारी अभियंता संजय प्रदीप जाधव (वय ५३) यांना ५ हजार रुपये लाच घेताना अँटी करप्शन ब्युरो, नवी मुंबईने रंगेहात पकडले. ही कारवाई दि. ८ जुलै २०२५ रोजी पेण सर्कल कार्यालयात करण्यात आली.
तक्रारदाराने खालापूर येथील त्यांच्या मालकीच्या जमिनीवरून उच्चदाब वाहिन्यांचे स्थलांतर करण्यासाठी शाक्य एंटरप्रायझेस या संस्थेच्या वतीने तांत्रिक परवान्याचा अर्ज महावितरण कार्यालयात सादर केला होता. परवाना मंजूर करून देण्यासाठी अभियंता जाधव यांनी ५ हजार रुपयांची लाचेची मागणी केली. तक्रारदाराने दि. ७ जुलै रोजी अँटी करप्शन ब्युरो, नवी मुंबई कार्यालयात तक्रार दाखल केली.
त्यानंतर दि. ८ जुलै रोजी शासकीय पंचासमक्ष पडताळणी दरम्यान अभियंता जाधव यांनी पुन्हा लाच मागितली. संध्याकाळी १५.३५ वाजता आयोजित सापळा कारवाईत त्यांनी तक्रारदाराकडून ५,००० रुपये स्वीकारले आणि अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.
कारवाईत पोलीस निरीक्षक किरणकुमार वाघ, पो. उप अधीक्षक धर्मराज सोनके, आणि सापळा पथकातील अरुंधती येळवे, विशाल अहिरे, प्रमिला विश्वासराव, उमा बासरे, निखिल चौलकर, योगिता चाळके यांनी सहभाग घेतला. या कारवाईचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, अपर पोलीस अधीक्षक संजय गोवीलकर, सुहास शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
रायगड, ठाणे आणि नवी मुंबई जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की, शासकीय कामासाठी कोणतीही लाच मागण्यात आल्यास अँटी करप्शन ब्युरो, ठाणे कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. 📞 022-25427979 | टोल फ्री क्र.: