घनःश्याम कडू
उरण, दि. १२ : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांसह झालेल्या बैठकीत प्रकल्पाच्या कामाची सविस्तर चर्चा झाली. या दौऱ्यास गणेश नाईक, महेश बालदी, मंदा म्हात्रे, प्रशांत ठाकूर तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीने राजकीय वजन लाभले.
फोटो, बैठक, दौरे झाले… पण जनतेसाठी महत्वाच्या गोष्टी गुप्त
दौऱ्यात प्रकल्पावरील गहन चर्चा झाली, फोटोशूटही पार पडले, मात्र जनतेला सर्वाधिक अपेक्षित असलेले विमानतळाचे प्रत्यक्ष उद्घाटन कधी होणार? आणि नामकरण काय असणार? हे दोन्ही प्रश्न अनुत्तरितच राहिले. या दौऱ्यानंतर कोणतीही ठोस घोषणा न झाल्याने जनतेत नाराजी आणि प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

उद्घाटनाची तारीख आणि नाव जाहीर का होत नाही? सामान्य जनता विचारतेय –
“विमानतळाचे उद्घाटन करण्याची एवढी भीती का? नामकरणावर सुरू असलेली राजकीय रस्सीखेच अजूनही थांबली नाही का?” अनेकांच्या मते हे सगळं निवडणुकीच्या तोंडावर मतांची ताटं वाढवण्यासाठी लटकवलेलं गाजर आहे.
दौरा फोटोपुरता मर्यादित?
नेत्यांनी पाहणी केली खरी, पण नामकरण किंवा उद्घाटनाबाबत एकही ठोस वाक्य न उच्चारता हा दौरा पार पडला. त्यामुळे “नेमकं काय पाहून गेले?” असा
विमानतळ प्रकल्प जनतेसाठी – घोषणा देखील जनतेला हवी!
या प्रकल्पाशी जनतेचे भवितव्य जोडले गेले आहे. त्यामुळे राजकीय नेतृत्वाने केवळ फाईली उलटसुलट न करता स्पष्टता आणि ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.