• Mon. Jul 14th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

जिल्ह्यात पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात प्रारूप प्रभाग रचना जाहीर

ByEditor

Jul 14, 2025

21 जुलै 2025 पर्यंत हरकती सादर करण्याचे आवाहन

रायगड, ता. 14 : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1961 (सन 1962 चा अधिनियम क्र. 5) अंतर्गत रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक विभाग व प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे. ही रचना जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडून सादर करण्यात आलेल्या आदेशाच्या आधारे महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात (दिनांक 14 जुलै 2025) प्रसिद्ध झाली आहे.

या प्रारूप आदेशाच्या प्रती पुढील ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील फलकावर, जिल्हा परिषद कार्यालयातील फलकावर, रायगड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व पंचायत समिती कार्यालयांच्या सूचना फलकांवर (पनवेल, कर्जत, खालापूर, सुधागड, पेण, उरण, अलिबाग, मुरुड, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर) राज्य शासन अथवा प्राधिकृत अधिकारी (जिल्हाधिकारी रायगड) यांच्याकडून सदर प्रारूप रचनेवर 14 जुलै 2025 नंतर विचार करण्यात येणार आहे.

या संदर्भात कोणालाही हरकत अथवा सूचना असल्यास, ती लेखी स्वरूपात, कारणांसह संबंधित तहसीलदार यांच्याकडे दिनांक 21 जुलै 2025 पर्यंत सादर करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर प्राप्त होणाऱ्या हरकती किंवा सूचना विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी कळविले आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!