• Wed. Jun 25th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांना रंगेहात पकडण्यात महाड एमआयडीसी पोलिसांना यश (व्हिडिओ)

ByEditor

Aug 13, 2023

प्रतिनिधी
महाड :
महाड जवळील बिरवाडी बाजारपेठेत शनिवारी मध्यरात्रीच्या वेळी बाजारपेठेतील मोरया सुपर मार्केटजवळ असलेल्या एसबीआय बँकेचे एटीएम फोडताना दोन चोरट्यांना रंगेहात पकडण्यात महाड एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे.

बिरवाडी बाजारपेठेतील मोरया सुपर मार्केट जवळ एसबीआय बँकेचे एटीएम मशीन आहे. शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास मनोज दत्तू सूर्यवंशी (वय 30, राहणार आंबेगाव, तालुका देवणी, जिल्हा लातूर) सध्या राहणार प्रशांत कदम राहणार खरवली तालुका महाड यांच्या घरी तर दुसरा आरोपी सुनील दशरथ गोगावले (वय 28, राहणार भालेकर कोंड किंजळोली, तालुका महाड जिल्हा रायगड) या दोन आरोपींनी एटीएमच्या कक्षाचे काचेचे दरवाजे फोडून आतमध्ये प्रवेश केला व एटीएमची लाईट बंद करून एटीएम मशीन व त्यामध्ये असलेला कॅमेरा तोडत असताना महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस गस्तीवर असताना त्यांना ही घटना प्रत्यक्ष कळली.

महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई विश्वजीत संजय पाटील यांनी गस्तीवर असताना आरोपींना बाहेरून आवाज दिला असता आरोपी सुनील दशरथ गोगावले याने त्याच्याकडे असलेले लोखंडी पक्कड पोलीस शिपाई विश्वजीत संजय पाटील यांच्या अंगावर फेकल्याने पोलीस शिपाई पाटील यांच्या उजव्या पायाला दुखापत झाली. त्या अवस्थेत बिरवाडी पोलिसांनी या चोरट्यांना रंगेहात पकडले.

याप्रकरणी भारतीय दंड विधान कलंब 379 511, 352 ,353, 393, व 34 अन्वये सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध कायदा 1984 कलम तीन प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मारुती आंधळे व पोलीस शिपाई राजहंस ज्ञानेश्वर नागदिवे हे उपविभागीय पोलीस अधिकारी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!