• Thu. Feb 12th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रेवदंडा मोठा कोळीवाड्यातील कुलस्वामिनी मंदिरात चोरी; चांदीचे मुखवटे व मूर्त्या गायब

ByEditor

Nov 25, 2025


रेवदंडा | सचिन मयेकर
रेवदंडा मोठा कोळीवाडा परिसरातील कुलस्वामिनी मंदिरात शनिवारी पहाटे (२२ नोव्हेंबर) झालेल्या चोरीची घटना उघडकीस आली आहे. मंदिरातील चांदीचे पवित्र देव चोरीस गेल्याचे प्राथमिक तपासातून स्पष्ट झाले आहे.

चोरट्यांनी कुलस्वामिनी देवीचा चांदीचा मुखवटा तसेच खंडेरायाच्या तीन चांदीच्या मूर्त्या मंदिरातून चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. चोरीस गेलेल्या सर्व चांदीच्या वस्तूंची एकूण किंमत अंदाजे दीड ते पावणे दोन लाख रुपयांच्या दरम्यान असल्याचे पोलिसांनी सांगितले.

कुलस्वामिनी आणि खंडेराय हे कोळी समाजाचे अत्यंत श्रद्धेचे देव मानले जात असल्याने या चोरीच्या प्रकारामुळे समाजामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठा कोळीवाडा परिसरात या घटनेची मोठी चर्चा असून, नागरिकांनी पोलिसांकडे चोरट्यांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!