• Tue. Jun 24th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

दिघी-आदगाव समुद्रामध्ये गुजरातची मासेमारी बोट बुडाली

ByEditor

Aug 20, 2023

कोणतीही जीवितहानी नाही, सर्व खलाशी सुखरूप

अभय पाटील
बोर्लीपंचतन :
श्रीवर्धन तालुक्यातील दिघी आदगाव दरम्यानच्या खोल समुद्रामध्ये गुजरात राज्यातून मासेमारी करण्यासाठी आलेली मासेमारी नौका लाटांच्या तडाख्यामुळे फुटून बुडाल्याची घटना 17 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. यातील सर्व प्रवासी सुखरूप असून त्यांची सुखरूप सुटका दुसऱ्या एका मच्छीमारी करणाऱ्या बोटीतील खलाश्यांनी व तटरक्षक दलाने केली.

गुजरात राज्यातून ‘बनासागर’ या नावाची मच्छीमारी नौका श्रीवर्धन तालुक्यातील दिघी-आदगाव दरम्यान अरबी समुद्रामध्ये खोल पाण्यात मासेमारी करीत असताना समुद्रातील लाटांच्या तडाख्याने बोटीच्या खालच्या बाजूची लाकडी फळी तुटल्याने बोटीमध्ये पाणी घुसून मासेमारी नौका बुडाल्याची घटना गुरुवारी 17 ऑगस्ट रोजी दुपारी 3 च्या दरम्यान घडली. या बोटीमध्ये 7 खलाशी काम करीत होते. ही घटना घडते वेळी जवळच मासेमारी करण्याऱ्या दुसऱ्या बोटीतील खलाश्यांनी पाहिल्याने ‘बनासागर’ या बोटीवरील खलाशांना सुखरूप वाचवण्यात त्यांना यश आले. त्यानंतर तटरक्षक दलाने या बुडालेल्या बोटीतील खलाशांना गुजरातमध्ये पाठवण्याची व्यवस्था केली अशी माहिती दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. प्रसाद ढेबे यांनी दिली.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!