• Mon. May 11th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

​तळा तालुक्यात वीज कोसळून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; अवकाळी पावसाचा पहिला बळी

ByEditor

May 9, 2026

तळा (प्रतिनिधी): रायगड जिल्ह्यात शनिवारी झालेल्या वादळी पावसाने एका निष्पाप बालकाचा बळी घेतला आहे. तळा तालुक्यातील कर्नाळा फळशेत येथे अंगावर वीज पडल्याने वेदांत भोसले (वय १४ वर्षे) या मुलाचा मृत्यू झाला. अवकाळी पावसापासून सामानाचा बचाव करण्यासाठी धावपळ करत असताना ही काळाने त्याच्यावर झडप घातली.

​मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळच्या सुमारास तळा परिसरात अचानक आकाशात ढग जमा होऊन विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे घराबाहेर असलेले सामान सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी वेदांत घराबाहेर पडला होता. सामानाची आवराआवर करत असतानाच अचानक त्याच्या अंगावर वीज कोसळली. या भीषण धक्क्याने वेदांत गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

​वेदांत हा अवघ्या १४ वर्षांचा होता. त्याच्या अकाली जाण्याने भोसले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

By Editor

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!