विठ्ठल ममताबादे
उरण : उरण पूर्व विभागातील काँग्रेसचे अध्यक्ष, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा रायगड जिल्हापरिषदेतील पक्ष प्रतोद बाजीराव दामा परदेशी (60) यांचे गुरुवार, दि. 24/8/2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले असून, त्यांचे कुटुंबीय व चिरनेरवासियांसह संपूर्ण उरण पूर्व विभागावर शोककळा पसरली आहे.
गावागावात धडाडीने विकासकामे करणारे संयमी नेतृत्व, अजात शत्रू मानले जाणाऱ्या बाजीराव परदेशी यांच्या निधनाची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली असून त्यांच्या चिरनेर येथील चिरनेर-खारपाडा महामार्गावरील निवासस्थानी व चिरनेर येथील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचे नातेवाईकांसह सर्वच राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.