किरण लाड
नागोठणे : येथील केएमजी विभाग मराठाआळीतील ग्रामस्थ मोरेश्र्वर पांडुरंग चितळकर यांचे वयाच्या 64 व्या वर्षी निधन झाले आहे. शांत, सयंमी, मेहनती स्वभावाचे मोरेश्र्वर यांचा धार्मिक, सामाजिक कार्यामध्ये मोठा सहभाग होता. मराठाआळी तसेच केएमजी विभागाचे सामाजिक कार्यकर्ते होते. आवाज जरी मोठा होता पण उभ्या आयुष्यात त्यांनी कोणाबरोबर भांडण केले नाही. अशा शांत स्वभावाचे कै. मोरेश्र्वर श्री संत सेवा मंडळ, नागोठणेचे सक्रीय कार्यकर्ते होते.
पडेल ते सामाजिक काम कोणतीही कुरकुर न करता पूर्ण करणे हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्ये होते. लेझीम खेळणे त्यांना प्रचंड आवाडायचे/ आई जोगेश्वरीच्या पालखीत तसेच केएमजी विभागातील श्री हनुमान जयंतीच्या पालखीत आवडीने, उत्साहाने लेझीम खेळायचे. अशा या सामाजिक, धार्मिक स्वभावाच्या व्यक्तिचे अचानकपणे जाणे सर्वांना हळहळ लावुन गेले आहे. कै.मोरेश्र्वर चितळकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मोठा भाऊ, दोन मुले, एक विवाहित मुलगी, जावई, चुलत भाऊ, पुतणे असा मोठा परिवार आहे. त्यांचे दशक्रिया विधी शनिवार, दि. 2 सप्टेंबर रोजी तसेच उत्तरकार्य (तेरावा) मंगळवार, दि. 5 सप्टेंबर 2023 रोजी मराठाआळी, नागोठणे येथे होणार आहेत.
